You are currently viewing “बेटी बचाओ बेटी पढ़ाओ” योजनेतून गुणवंत युवती व महिलांचे झाले सत्कार

“बेटी बचाओ बेटी पढ़ाओ” योजनेतून गुणवंत युवती व महिलांचे झाले सत्कार

“बेटी बचाओ बेटी पढ़ाओ” योजनेतून गुणवंत युवती व महिलांचे झाले सत्कार

बेटी बचाओ बेटी पढ़ाओच्या जिल्हा संयोजक पदी मेघा गांगण यांची नियुक्ती

कणकवली :

भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत कणकवली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डाॅ. शुभा फरांदे- पाद्धे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल युवती व महिलांचे सत्कार करण्यात आले.

यामध्ये कु. कादंबरी महेश राणे,प्रियांका नारायण सावंत,अनुजा प्रदीप काटकर,स्वरा सागर चव्हाण ,हेमलता रविंद्र राऊळ,करिष्मा चंद्रशेखर सोन्सुरकर,अनुष्का प्रशांत पोकळे,सायली महेश घारे,शमिका सचिन चिपकर,भावना सचिन ठाकूर ,संतोषी ,सुशांत आळवे ,यामुली व महिलांना शाल श्रीफळ आणि सर्टिफिकेट देण्यात आली.

त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाव च्या संयोजक आणि वारियर्सना नियुक्ती पत्र देण्यात आली.बेटी बचाव बेटी पढाव च्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून मेघा अजय गांगण यांची नियुक्ती करण्यात आली. कणकवली देवगड विधानसभा संयोजक म्हणून प्रणाली माने, कुडाळ मालवण विधानसभा संयोजक म्हणून सुप्रिया संतोष वालावलकर, वेंगुर्ला सावंतवाडी विधानसभा संयोजक म्हणून सुजाता संदिप देसाई यांची निवड करण्यात आली. सहसंयोजक म्हणून प्राची तावडे वैभववाडी, महिमा मयेकर मालवण, दिपाली दिलीप भालेकर सावंतवाडी , कल्पना बुडकुले दोडामार्ग यांची निवड करण्यात आली.तसेच वारियर्सना नियुक्तीपत्र देण्यात आली.

तसेच हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. उपस्थित महिलांसाठी लकी ड्राचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला बेटी बचाओ च्या कोकण प्रभारी अंजलीताई साळवी, पायल कबरे ठाणे विभाग प्रभारी, प्रज्ञाताई ढवण प्रदेश उपाध्यक्षा, श्वेताताई कोरगावकर महिला जिल्हाध्यक्ष, संध्याताई तेरसे महिला प्रदेश सदस्य आणि सर्व तालुकास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रस्तावना मेघा गांगण यांनी केली. आभार प्रदर्शन भाग्यलक्ष्मी साटम यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा