You are currently viewing “एमआयटीएम” कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रथम

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रथम

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रथम

कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज आणि माधवराव पवार विद्यालय कोकिसरेच्या प्रतिकृतींना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक ; विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड याठिकाणी नुकतेच विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये शिवाजी इंग्लिश स्कुल पणदूर च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. तर कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज आणि माधवराव पवार विद्यालय कोकिसरे वैभववाडी च्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रतिकृतींना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला.


या प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रदर्शनामध्ये ३० उत्कृष्ट मॉडेलची मांडणी करण्यात आली होती. या मॉडेलमध्ये स्मार्ट होम, टेलिस्कोप, स्मार्ट हेल्मेट, न्यूक्लिअर एनर्जी, जलशोषणास्त्र आणि कचरा साफ करण्याचे यंत्र यांचा समावेश होता.

या प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या विराज गोसावी, मनीष मेस्त्री यांनी आर.जी.करपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या “स्मार्ट होम “या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. तर द्वितीय क्रमांक कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळच्या हर्ष चिरेकर यांनी साईप्रसाद वेंगुर्लेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या “टेलिस्कोप”या मॉडेलला मिळाला. तृतीय क्रमांक माधवराव पवार विद्यालय कोकीसरे वैभववाडीच्या गौरांग बारकर, अयान आरवाडे यांनी श्रीमती दिपाली हिरुगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “स्मार्ट हेल्मेट” या मॉडेलला मिळाला. उत्साहजनक पारितोषिक विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसालच्या चैतन्या तेंडोलकर, तनिश तेंडोलकर यांना न्यूक्लर एनर्जी प्रदर्शनीय वस्तू या मॉडेलला गुरुनाथ कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला. तर पाचवा क्रमांक भगवती हायस्कूल मुणगे देवगडच्या श्रेयस सावंत यास श्री. बागवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली “जलशोषणास्त्र” या मॉडेलला मिळाला.सहावा क्रमांक वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे कणकवलीच्या सुचित्रा तळेकर हिला ए. एस. गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला.

या प्रदर्शनास परीक्षक म्हणून एस.आर.एम.कॉलेज कुडाळचे प्रोफेसर भावेश चव्हाण आणि शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्रोफेसर राजेंद्र पेंढम यांनी काम पाहिले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष वामन तर्पे आणि सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वामन तरपे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी शास्त्रज्ञ आणि संशोधक व्हावेत आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी या हेतूने हे विज्ञान प्रदर्शन खूप गरजेचे आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विविध शोध लावून तंत्रज्ञानाची त्यासोबत जोड असणे,आवश्यक आहे, असे ते म्हणाले तर पांडुरंग काकटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपला देश हा तरुणांचा देश आहे. संपूर्ण जगातील देशाचे लक्ष आपल्या देशाकडे आहे. विद्यार्थी कोणत्याही ग्रामीण भागातील असू देत पण जर तंत्रज्ञानाच्या आणि विद्यार्थ्यांची जोड असेल तर चमकणारा हिरा कुठेही चमकणारच यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे आवश्यक आहे, असे सांगितले. डिप्लोमा प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली कला दाखवण्याची संधी प्राप्त झाली तर नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एम.एस.सी. बी. सारख्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. केंद्र शासन राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक विद्यार्थी हा उद्योजक होणे आवश्यक आहे, असे सांगितले. तर डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. व्ही.ढणाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना येथील विद्यार्थी हे सी. व्ही.रमण यांच्यासारखे घडावे. यांच्या कार्यक्षेत्रासारखे तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र घडवा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पालव या विद्यार्थिनीने केले. तर ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. मयुरी दिवाण व आणि सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले. विज्ञान प्रदर्शनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम,सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम आणि संस्थेचे विश्वस्त केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा