You are currently viewing संवाद नात्यांचा

संवाद नात्यांचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*..संवाद नात्यांचा…*

 

हरवत चाललाय

नात्यानात्यातील संवाद

शब्दच बाद

बोलण्यातून…

 

संवादाचे महत्व

होतात विचार व्यक्त

घुसमटते अव्यक्त

मन…

 

साधक बाधक

चर्चा महत्त्वाची असते

विचारांची होते

देवाणघेवाण.

 

कुटुंब मुलांशी

संवाद सदैव साधावा

बोलका असावा

संसार…

 

समाजात मिसळता

संवाद असतात आवश्यक

होते कल्पक

बुध्दी…

 

जेष्ठांशी संवाद

हवेत शब्द चार

प्रेमळ विचार

आनंदादायी….

 

व्यक्तीने व्यक्तीशी

संवाद नित्य साधावा

अंतरी गोडवा

लाभतो….!!

 

००००००००००००🌹🌿

अरुणा दुद्दलवार@✍️

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा