You are currently viewing मळगावात वनविभागाच्यावतीने “वणवा प्रतिबंधक सप्ताह” साजरा…

मळगावात वनविभागाच्यावतीने “वणवा प्रतिबंधक सप्ताह” साजरा…

मळगावात वनविभागाच्यावतीने “वणवा प्रतिबंधक सप्ताह” साजरा…

सावंतवाडी

येथील वनविभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती मळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “वणवा प्रतिबंधक सप्ताह” साजरा करण्यात आला. यावेळी वणव्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम व वणवा रोखण्यासाठी करण्यात येणारे नियोजन याबाबत जनजागृती करण्यात आली. मळगाव ग्रामपंचायत कार्यालयात हा उपक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी वन अधिकारी मदन क्षीरसागर, विजय पांचाळ, वनरक्षक प्रकाश राणगिरे, रमेश पाटील, रामचंद्र रेडकर, मळगावचे प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ गावकर, विजयानंद नाईक, गणेशप्रसाद पेडणेकर, गजानन सातार्डेकर आदी उपस्थित होते.

वन वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्तीची हानी होऊन त्याचे निसर्गावर होणारे दृश्य व अदृश्य दुष्परिणाम अमाप आहेत. वणव्यामुळे सरपटणारे वन्यजीव, उभयचर प्राणी, पक्ष्यांची घरटी, अंडी जळून खाक होतात. झाडे, झुडपे, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. ज्यामुळे गवा, बिबट, शेकरू, माकड, सांबर इत्यादी वन्यजीव मानवी वस्तीमध्ये तसेच शेतबागायतीमध्ये स्थलांतरित होतात ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत जातो. या सर्व दुष्परिणामांचा विचार करता वन वणवा रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी केले आहे.

संयुक्त वनव्यवस्थापन समिती मळगाव यांनी आजवर वन वणवा रोखण्यासाठी वन विभागाला मोलाचे योगदान दिलेले आहे. या दिलेल्या सामुदायिक योगदानाबद्दल वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी मळगाव ग्रामस्थांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा