You are currently viewing सावंतवाडी संस्थान मराठा समाज वधुवर मेळावा

सावंतवाडी संस्थान मराठा समाज वधुवर मेळावा

सावंतवाडी संस्थान मराठा समाज वधुवर मेळावा

बांदा

सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचालित सावंतवाडी आणि कुडाळ समिती तर्फे वधुवर परिचय मेळावा रविवार ११ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले व. दोडामार्ग तालुक्यातील यंदा कर्तव्य असलेल्या युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे. संबंधितांनी सदर मेळाव्यात सहभागी होऊन नोंदणी करावी. दहावी व बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या मुलींसाठी येथे विशेष नोंदणी करण्यात येणार आहे. सदर मेळावा बांदा ग्रुप वि. का. स. सेवा सोसायटी सभागृह, बांदेश्वर मंदिरजवळ येथे सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. अधिक माहितीसाठी नारायण (बाळू) गावडे ९४२१०३७३२९, भरत गावडे, प्रल्हाद सावंत आणि मेघना राऊळ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा