*भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा*
*सच्चिदानंद उर्फ संजु परब , जिल्हा सहसंयोजक – गाव चलो अभियान* .
वेंगुर्ले
२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला . गरिब कल्याण , महीला सशक्तीकरण , देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगीरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव ऊंचावले आहे . आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे , असे आवाहन ” गाव चलो अभियान ” चे जिल्हा सहसंयोजक सच्चिदानंद उर्फ संजु परब यांनी केले .
वेंगुर्ले तालुक्याची ” गाव चलो अभियाना ” ची बैठक तालुका कार्यालयात भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती . यावेळी मान्यवर म्हणून सच्चिदानंद उर्फ संजु परब , प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , वसंत तांडेल इत्यादी उपस्थित होते .
यावेळी ” गाव चलो अभियान ” च्या वेंगुर्ले तालुका संयोजक म्हणून साईप्रसाद नाईक व सहसंयोजक म्हणून बाबली वायंगणकर व विष्णु उर्फ पपु परब यांची निवड करण्यात आली .
यावेळी मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले कि , राष्ट्रीय अध्यक्ष मान.जे.पी.नड्डा यांनी ” गाव चलो अभियान ” सुरु करण्याचा आदेश दिलेला असून , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवुन जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे . या अभियानात प्रत्येक बुथवर एक ” प्रवासी कार्यकर्ता ” आठवडाभर त्याला दिलेल्या बुथवर जाऊन लाभार्थ्यांशी संवाद , युवक – शेतकरी – व्यवसायीक यांच्या गाठीभेटी , प्रभावशाली व्यक्तींशी संवाद , विचार परिवारातील कार्यकर्त्यांच्या भेटी , स्वयंसेवी संस्था तसेच बचत गटातील महीला प्रतिनिधींशी भेट घेऊन व बुथ समीती व पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील असलेल्या जबाबदाऱ्या सोपवुन प्रत्येक बुथवर ५१% पेक्षा अधिक मते मिळविन्याचे नियोजन करावे असे आवाहन केले .
यावेळी या अभियानाच्या अनुषंगाने प्रत्येक पंचायत समिती निहाय बैठकांचे नियोजन करून , जबाबदारीचे वाटप करण्यात आले .
यावेळी जिल्हा का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर , खानोली सरपंच सुभाष खानोलकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , मठ सरपंच रुपाली नाईक , आसोली उपसरपंच संकेत धुरी , आरवली सरपंच समीर कांबळी , पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , मठ उपसरपंच बंटी गावडे , रेडी सरपंच रामसिंग राणे ,आसोली सरपंच बाळा जाधव , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , शक्तिकेंद्र प्रमुख सोमा मेस्त्री – सुधीर गावडे – सुनिल चव्हाण – महादेव नाईक – जगन्नाथ राणे , भुषण सारंग , प्रीतेश राऊळ , ता. चिटणीस नितीन चव्हाण व जयंत मोंडकर , दाजी परब , संदेश गावडे , सत्यवान पालव , बुथ प्रमुख नागेश सारंग , शंकर म्हेतर , नगरसेवीका श्रेया मयेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , देवेंद्र वस्त , संदिप देसाई ,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , सोमनाथ टोमके उपस्थित होते .