*क्रिकेट स्पर्धेच्या आडून जुगाराच्या बैठका*
*खाकीचा आशीर्वाद आणि अवैध्य दारू व्यावसायिकांची मदत*
*माणगाव खोऱ्यात कानचे ची बैठक तेजीत*
माणगाव खोऱ्यात खाकी वर्दीचा आशीर्वाद लाभल्याने दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होणाऱ्या जुगाराच्या बैठका बसत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनभिज्ञ ठेवत त्या त्या बीट वरील अंमलदार आपली पोळी भाजून घेत आहेत. खाकीचा शिलेदार हाताशी धरल्याने दिवसभर जुगाराचे पद्धतशीर नियोजन केले जात आहे.
माणगाव खोऱ्यात (ना)नेली येथील काळ(बा) मंदिराच्या पाठीमागे (रा)मा (का)नचे याची जुगाराची मैफील दुपारी ४.०० वाजल्यापासून सुरू होते ती रात्री ९.०० वाजेपर्यंत तुफानी गर्दीत सुरू असते. या जुगाराच्या बैठकांचा संबंध माणगाव खोऱ्यातील अवैध्य दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांशी जोडला जात असून बैठकांना स्थानिक खाकीचा आशीर्वाद देखील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
उद्या (कु)टब्रिज तिठ्यावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली असून खाकीच्या शिलेदार कोई यांना हाताशी धरून दिवसभर जुगाराचे आयोजन केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गावागावात जत्रोत्सव संपल्यावर क्रिकेटचा हंगाम जोरात सुरू होतो. अशावेळी क्रिकेट स्पर्धांच्या आडून जुगाराच्या बैठका बसविल्या जातात आणि त्यातून लाखोंची उलाढाल होते. दोन चार हजार रुपये स्पर्धेसाठी बक्षीस पुरस्कृत करून स्पर्धेच्या आड जुगारासारखे अवैध्य धंदे केले जातात. त्यामुळे क्रिकेट स्पर्धेसाठी येणारी तरुण पिढी पैशांच्या लोभापायी जुगार खेळण्यासाठी आकर्षित होते, परिणामी जिल्ह्यातील तरुणाई व्यसनाधीन होत आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सदर बाबीकडे गंभीरपणे पहावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.