You are currently viewing सावंतवाडी गांधीचौकात काळ्या काचांच्या गाडीवर कारवाई

सावंतवाडी गांधीचौकात काळ्या काचांच्या गाडीवर कारवाई

सावंतवाडी गांधीचौकात काळ्या काचांच्या गाडीवर कारवाई

सावंतवाडी पोलीस व जोडप्यात वाद…

सावंतवाडी

काळ्या काचांच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून एका दांपत्याने सावंतवाडीतील वाहतूक पोलिसांची जोरदार वाद घातला. आपल्या गाडीवरच कारवाई का? अन्य गाड्यांवरील कारवाई करा, अशी त्यांनी मागणी केली.

ही घटना येथील गांधी चौक परिसरात घडली. मात्र गेल्या काही दिवसात शहरात काळ्या काचांच्या गाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आणखी दोन गाड्यांवर कारवाई केली. हा प्रकार सुरू असताना नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. संबंधित जोडपे हे शहरात राहणारे आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आपण त्यांना यापूर्वी चार वेळा काचा बदला अशी मागणी केली होती. परंतु त्यांनी बदलतो, असे सांगून काचा तशाच ठेवल्या होत्या. त्यामुळे आज आपण त्यांच्यावर कारवाई केली. आपल्यावर कारवाई झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अन्य गाड्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. त्यानुसार अनूय दोन गाड्यांवर कारवाई करण्यात आली, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =