You are currently viewing अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु.विद्या राजकुमार सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेती.

अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु.विद्या राजकुमार सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेती.

अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु.विद्या राजकुमार सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेती.

महाराष्ट्र स्टुडंट इनोवेशन चॅलेंज उपक्रमामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे  यश.

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या “महाराष्ट्र स्टुडंट इनोवेशनन चॅलेंज” या स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील एकूण १० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून तीन विद्यार्थिनींची (दोन प्रकल्प) निवड जिल्हा सादरीकरणासाठी झाली होती. त्यातून द्वितीय वर्ष एम. ए. अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु. विद्या राजकुमार सावंत ही जिल्हास्तरीय विजेती झाली आहे.

२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ओरोस येथे जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकरी अधिकारी यांच्या उपस्थितीत कु. विद्या राजकुमार सावंत हिला महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तिच्या प्रकल्पासाठी एक लाख रुपये बीज भांडवल व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब सौ.  शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.  यावेळी संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल भारमल, प्रा. एम. ए. ठाकूर, प्रा. सौ. नीलम धुरी, प्रा. तानाजी कांबळे, डॉ. संदीप पाटील, प्रा. अभिजीत शेटकर उपस्थित होते.

सदर प्रकल्पासाठी तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, माजी रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी. डी. गोडकर, वाणिज्य विभागाचे प्रा. हर्षद राव, महाविद्यालयातील करिअर कक्ष उद्योजक समन्वयक प्रा. एम. ए. ठाकूर, करिअर कक्ष IAS समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. नीलम धुरी, इनोवेशन समिती व भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा. तानाजी कांबळे व प्रा. अभिजीत शेटकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य  लाभले.

तिच्या या यशासाठी महाविद्यालय तसेच समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =