You are currently viewing न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ

न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ

*न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ*

सावंतवाडी

मागील काही दिवासांपासून न्हावेली सोनुर्ली आरोस पंचक्रोशीत बीएसएनएलच्या ब्रेकडाऊन नेटवर्कमुळे येथील जनतेचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करून देखील बीएसएनएल अधिकाऱ्यांचा यावर दुर्लक्ष होत आहे. या बाबतच्या तक्रारी आज न्हावेली रेवटेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक संदेश सावंत यांच्याकडे रहिवाशानी केल्या असून त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात सदर गावात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास न्हावेली आरोस सोनुर्ली गावातील ग्रामस्थांसहित बीएसएनएल जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नू यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा विभाग समन्वयक श्री सावंत म्हणाले. पंचक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थी व बीएसएनएल ग्राहकांचे हाल होत आहेत. आजही कित्येक युवक वर्क फ्रॉम होम करीत आहेत तर पुढे काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थी वर्गाचे मोठ नुकसान होत असून याची जबाबदारी बीएसएनएल आपल्या डोक्यावर घेणार की रिचार्जच्या माध्यमातून फक्त पैसाच गोळा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

तरी येत्या दोन दिवसात सेवा सुधारा अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास तयार रहा असा इशारा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री सावंत यांनी जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नु यांना दिला आहे.

तर जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्याशी संपर्क साधला असता आज त्या ठिकाणी टेक्निकल टीम दाखल होणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा