*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*💐विवाहगीत💐*
दारी सजली रांगोळी
बांधू हिरवे तोरण
लेकीच्या गं विवाहास
आज सजले अंगण…..।।
,
झुला मनात झुलतो
स्वप्नी आला गं साजण
शालू हिरवा अंगावर
किणकिणली काकणं…..।।
शिकवली तुला बाई
वागण्याची जगी रीत
बाबा देतात विश्वास
आई ममतेचं गीत….।।
माहेराची सारी माया
तुला ओटीत मी देते
संस्कारांची ही शिदोरी
आयुष्यात साथ देते….।।
आनंदले घरदार
तुझे सुंदर सासर
हसरे गं घरकुल
भाग्यवान जोडीदार….।।
आशीर्वाद आम्ही देतो
फुलू दे तुझा संसार
जसा वेलीवर फुले
गंधकळ्यांचा बहर….।।
🌷🍃🍃🌷🌷🍃🍃🌷
अरुणा दुद्दलवार@✍️