– पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र पणजी, गोवा
सिंधुदुर्गनगरी
पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या, निवृत्ती तक्रारीचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी गोवा पोस्टल क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता “पेन्शन अदालतीचे ” आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र पणजी, गोवा यांनी दिली आहे.
पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्रीय कार्यालय यांच्या अंतर्गंत गोवा राज्य, सिंधुदुर्ग, सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी या जिल्ह्याचा समावेश आहे. डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे 3 महिन्याच्या आत निराकरण झालेले नाही. ज्या कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा सर्व तक्रारीची या डाक पेन्शन अदालतीमध्ये दखल घेतली जाईल.कायद्या संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेन्शन अदालतीमध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तरी तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मुळ तक्रार पाठविली आहे. त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. तरी संबंधितांनी आपली तक्रार अतिरिक्त प्रतिसह श्री. शिवकुमार वर्मा, वरिष्ठ लेखाधिकारी, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा यांच्या कार्यालयास दिनांक 20 डिसेंबर 2020 पर्यंत किंवा तत्पूर्वी पोहचतील या रीतीने पाठवावी. दिनांक 20 डिसेंबर 2020 नंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार नाही. असे पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र पणजी गोवा यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.