You are currently viewing सावंतवाडीत नॅब नेत्र रुग्णालयाच्या सभागृहाचे उद्घाटन

सावंतवाडीत नॅब नेत्र रुग्णालयाच्या सभागृहाचे उद्घाटन

सावंतवाडीत नॅब नेत्र रुग्णालयाच्या सभागृहाचे उद्घाटन

सावंवाडी

नॅब सिंधुदुर्ग सावंवाडीतील नेत्र रुग्णालय येथील पहिल्या मजल्यावरील हॉल चे उद्घाटन मा. श्री. संग्रामजी पाटीलसाहेब उद्योगपती कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सिंधुदुर्ग नॅब चे अध्यक्ष श्री अनंत व्यंकटेश उचगावकर, सचिव श्री सोमनाथ जिंनी, श्री.प्रणय तेली रो.सचिन गावडे, असिस्टंट गव नर.सौ.रिया रेडीज, रो.सुहास सातोस्कर, रो.राजेश रेडीज, रो.राजन शिरोडकर, रो.प्रवीण परब, रो. आबासाहेब कशाळीकर, रो.विनय बाँड, सौ. मीना जोशी, डॉ. शुभदा करमरकर, तसेच आर्किटेक्चर रो. अभिषेक माने या वेळी आवर्जुन उपस्थित होते. व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभर दृष्टि बाधित उपस्थित होते.

नॅब च्या अध्यक्षांनी नॅबची झालेली 32 वर्षातील खडतर वाटचालीचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सेवाभावी वर्गा कडून मिळालेल्या पैशातून हे काम शक्य होत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांच्या सोयी साठी अत्यंत आधुनिक नेत्र रुग्णालय सावंतवाडी शहरात सुरू करण्याचे भाग्य मिळाले, या बद्दल सर्व आर्थिक दान देणाऱ्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अद्याप सर्व काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अजून आर्थिक मदत अपेक्षित असल्याचे सांगितले. उद्घाटक मां.रो.संग्राम पाटील साहेब यांनी आपल्या भाषणात नेत्र रुग्णालय,ऑपरेशन थीएटर, सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून खूप कौतुक केले. नॅब सिंधुदुर्गच्या कामाचे कौतुक केले. विषेश करून रो.अनंत उचगावकर,
रो.आबा कशाळीकर, व रो.सोमनाथ जिनी याचे कामाचे कौतुक केले.या प्रसंगी या रुग्णालयाच्या कामा निमित्त आपली रुपये एक लाख एकावन्न हजार रुपये नॅब सिंधुदुर्ग संस्थेला देणगी दिली. रो.सोमनाथ जिनी यांनी पाहुण्याची ओळख व आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन रो. सत्याजित धारणकर यांनी केले. सौ.बिना म्हाडगुत कु. इंदुलकर इत्यादी उपस्थित होते.सर्व दृष्टि बाधितांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा