You are currently viewing काव्यकुस्तीच्या आखाड्यात !

काव्यकुस्तीच्या आखाड्यात !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काव्यकुस्तीच्या आखाड्यात !*

 

काव्यकुस्तीच्या आखाड्यात

कवी एखादा आडवा पडावा

पेच लावता लावता निसटूनी यमरूपी

यमक त्याच्या छातडावर नाचावा

 

आडदांड कविता त्याची डोक्यावरून

धोबीपछाड चालीने निघून जावी

फेसाळलेल्या कवीच्या दमछाकीने

मुखचंद्राला ग्रहणाची दशा यावी

 

काव्याच्या बगलेत शिरता शिरता

गुदमरून दमून कवितेचे गाणे व्हावे

अस्मानी डावात बेधुंद गाण्याने

कवीला रिंगणा बाहेर फेकून द्यावे

 

कवीने वेळेच बंधन न जुमानल्याने

कवितेने शेवटी मान टाकावी

मानगुटीवरून कवितेची सुटका करत

संयोजकांनी काव्यकुस्ती थांबवावी.!

 

आपटून धोपटून लोळवून

कुस्ती निकाली झाली नाही

आडव्या पहलवानाची कास

कवितेने काही सोडली नाही..!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा