You are currently viewing सातार्डा पोलीस नाक्यावरून भाजपा पदाधिकारी झाले आक्रमक

सातार्डा पोलीस नाक्यावरून भाजपा पदाधिकारी झाले आक्रमक

पोलीस नाक्यावर जाऊन विचारला जाब

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

बांदा :
महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवरील सर्व सीमा आज खुल्या करण्यात आल्या. मात्र सातार्डा तपासणी नाका बंद ठेवण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी मंडल अध्यक्ष महेश धुरी व युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, शेखर गावकर यांच्या नेतृत्वाखाली सातार्डा , आरोंदा दशक्रोशीतील २०० हुन अधिक युवकांनी सातार्डा पोलीस नाक्यावर जाऊन जाब विचारला. यामुळे नाक्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सर्व नाकी सुरू असताना या नाक्यावरच प्रवासाची बंदी का? असा सवाल विचारण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपण यासंदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महेश धुरी व जावेद खतीब यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी फोन वर चर्चा केली. यावेळी श्री तेली यांनी आपण यासंदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली असून आज सायंकाळी परिपत्रक काढून तपासणी नाका वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले.

भारतीय जनता पक्ष बांदा मंडल उपतालुकाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ, भाजप बांदा मंडल युवक सचिव अजित कवठणकर, भाजप बांदा मंडल युवक कार्यकारिणी सदस्य प्रितेश आरोंदेकर, किनळे उपसरपंच वैभव सोपटे, सामाजिक कार्यकर्ते अरुण केरकर, सागर प्रभू, राजन कवठणकर, शेखर केरकर आणि सातार्डा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा