*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम रचना*
*श्रीरामभक्त!!!*
अयोध्यातल्या त्या भव्य सुंदर मंदिराची उभारणी झाली।
श्रीरामांची सुंदर मूर्ती स्थापित झाली, प्राण प्रतिष्ठा झाली ।
खूप खूप वर्षांचं नव्हे, शतकांचं स्वप्न पुरे झालं।
श्रीरामाच्या भक्तानं मनोभावे पुजा केली ।
आपलं मस्तक टेकवलं,स्तब्ध बसून प्रार्थना केली।
त्या भक्तानं श्रीरामांना विचारलं’आतातरी मी हिमालयात जाऊ शकतो ना प्रभू?’
श्री रामचंद्र म्हणाले ‘बाळा अजून कितीतरी काम बाकी आहे ।
मी जेव्हा सोन्याची लंका जिंकली, तेव्हा मला लंकेचा मोह झाला नाही।
मी तेव्हा म्हटलं होतं जननी जन्मभूमिश्र्च ,स्वर्गादपि गरियसी
मला भरतभूमि खुणावत होती, अयोध्या दोन्ही बाहू पसरून बोलावत होती।
त्याच माझ्या या जन्मभूमिची अवस्था पाहिलीस ना बाळा?
धर्मापासून, कर्तव्यापासून किती दूर गेली आहे प्रजा?
सर्व विकारांनी त्यांच्या मनाला ग्रासलं आहे।
या भूमिला वाचवण्यासाठीच तुझी योजना झाली आहे ।
तूं उत्तमरित्या कर्तव्य पार पाडत आहेस ।
पण अजून खूप कामं बाकी आहेत।
अजून काही काळ जाऊ दे ।
बाळा,तूं खूप दमतोस हे माहीत आहे मला।
पण अजून काही काळ तुला हे काम करावं लागणार आहे।
आर्यावर्त या अंधःकारातून बाहेर येऊ दे ।
भक्ताचे डोळे भरून आले होते ।
पण प्रभु रामांनीच सोपवलेली कामगिरी करावीच लागणार होती।
भक्तानं भरल्या कंठानं,मनानं,नेत्रांनी आज्ञा घेतली।
मंदिराबाहेर येऊन कर्तव्यकर्मांना सुरवात केली।
विद्या रानडे २७|१|२४