You are currently viewing भाजपा इचलकरंजी विधानसभा मतदार संघ रिक्षा आघाडीच्या अध्यक्षपदी भगवान बरगाले

भाजपा इचलकरंजी विधानसभा मतदार संघ रिक्षा आघाडीच्या अध्यक्षपदी भगवान बरगाले

भाजपा इचलकरंजी विधानसभा मतदार संघ रिक्षा आघाडीच्या अध्यक्षपदी भगवान बरगाले

इचलकरंजी : प्रतिनिधी

भाजपा इचलकरंजी विधानसभा मतदार संघ रिक्षा आघाडीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू बरगाले यांची निवड करण्यात आली.सदर निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते भगवान बरगाले हे नेहमीच सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असतात.रिक्षा व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील आहेत.त्यांंच्या कार्याची दखल घेऊनच त्यांची भाजपा इचलकरंजी विधानसभा मतदार संघ रिक्षा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.यावेळी नूतन पदाधिकारी भगवान बरगाले यांनी मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून रिक्षा व्यावसायिकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे ,भाजप पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले ,माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार , जेष्ठ नेते हिंदुराव शेळके ,संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या ,मिश्रीलाल जाजू ,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष
जयेश बुगड यांच्यासह विविध पदाधिकारी ,रिक्षा चालक व
कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा