You are currently viewing भाजपा इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्षपदी उमाकांत दाभोळे 

भाजपा इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्षपदी उमाकांत दाभोळे 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

भाजपा इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या कार्यालयात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उमाकांत दाभोळे यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेचे मुलभूत नागरी प्रश्न सोडवतानाच पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते हिंदुराव शेळके, शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजू,पांडुरंग म्हातुगडे, दिपक राशीनकर, रणजीत अनुसे, मनोज साळुंखे, प्रसाद खोबरे, सौ.विजया पाटील, सौ. रमा फाटक, सौ.नीता भोसले, सौ.संगीता घोरपडे, सौ.निर्मला मोरे, सौ.योगिता दाभोळे, सौ.माधवी मुंडे, सौ.शबाना शहा, सुप्रिया मजले, चंद्रकांत चौगुले, राजेंद्र पाटील, ब्रत जोशी,बाळासाहेब पाटील, प्रविण पाटील, अमित जावळे, प्रदिप कांबळे , नामदेव सातपुते व बूथ प्रमुख,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा