You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का….

सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का….

जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

सावंतवाडी
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का बसला आहे. सावंतवाडी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस शाफिक खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब, अनंत पिळणकर, व्हिक्टर डॉन्टस, अफरोज राजगुरू, सुरेश गवस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सत्यजित धारणकर, आशिष कदम, हिदायत खान, नवल साटेलकर, चित्रा बाबरदेसाई, अशोक पवार, जावेद शेख, सचिन पाटकर आदींसह राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा