You are currently viewing स्नेहल माळी यांना रोटरी क्लबचा युवा गौरव पुरस्कार जाहीर

स्नेहल माळी यांना रोटरी क्लबचा युवा गौरव पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी येथील रोटरी क्लबच्या वतीने राष्ट्र सेवा दलच्या युवती संघटिका स्नेहल राजेंद्र माळी यांना युवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्र सेवा दलच्या युवती संघटिका स्नेहल माळी यांनी संविधान प्रचार प्रसाराबरोबरच विविध माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य, राष्ट्र सेवा दलातून देशप्रेम जागृत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन व सुसंस्कारित पिढी घडवण्याच्या कार्यात अग्रेसर राहून आजच्या तरुणाईला सामाजिक भान देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी या संस्थेने यंदाच्या वर्षीचा त्यांना युवा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.

या पुरस्काराचे वितरण बुधवार दि.२४ मे रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 16 =