शालेय विद्यार्थी चित्रकला स्पर्धेचे आयोजन….

शालेय विद्यार्थी चित्रकला स्पर्धेचे आयोजन….

दोडामार्ग एक्सप्रेस मंच आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय मर्यादित शालेय विद्यार्थी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

दोडामार्ग प्रतिनिधी
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली राहण्यासाठी,,, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं व्यासपीठ
दोडामार्ग एक्सप्रेस मंच उपलब्ध करुन देत आहे.

विषय-पर्यावरणपूरक गणपती चित्रकला स्पर्धा.
अटी आणि नियम
१) चित्रसाठी A4 साईज कागद वापरावा.
२) संपूर्ण चित्र पानभर असावे .
३) चित्रात निसर्ग / पर्यावरण पूरक साहित्य दिसेल याचे भान असावे.
४)दोन गट – पहिला गट १ ते ४ , दुसरा गट ५ते ८ पर्यंत.
५)दोडामार्ग एक्सप्रेस मंच समितीमार्फत चित्रांची निवड करण्यात येईल निवडीबाबत कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
६)आपले चित्र चांगले स्पष्ट दिसेल असे मोबाइल वरून फोटो काढून संस्थापक, मनोज माळकर दोडामार्ग एक्सप्रेस मंच 9324192492 व श्री.संदीप सुरेश सावंत, संयोजक दोडामार्ग एक्सप्रेस मंच 9421262678 या व्हाट्सएपच्या नंबरवर पाठवायचे आहेत.
७)अंतिम स्पर्धेत प्रत्येक गटातून प्रथम,द्वितीय आणि तृतीय व दहा उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना दोडामार्ग एक्सप्रेस मंचतर्फे ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
८)दोडामार्ग एक्सप्रेस मंचच्या पुढील समारंभ कार्यक्रमात सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.
९)सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.
१०)दिनांक २०/०९/२०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच आलेल्या चित्रांचा मूल्यांकनासाठी विचार केला जाईल.
११) चित्रांच्या पाठीमागे संपूर्ण नांव, शाळेचे नावं, इयत्ता, मोबाईल क्रमांक याचा उल्लेख करावा.(मागच्या पानाचा फोटो पाठवा)
१२)चित्राची मुख्य प्रत (काढलेले चित्र) सांभाळून ठेवावे ते आपल्या कडून गरज पडली तर मागून घेतले जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.
१३) निकाल :२५ सप्टेंबर २०२० रोजी घोषित करण्यात येईल.
आपल्या सुंदर-सुंदर चित्रांची आम्ही वाट पाहत आहोत.जास्तीत जास्त विध्यार्थीनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे
दोडामार्ग एक्सप्रेस मंच संस्थापक मनोज माळकर , संयोजक संदीप सुरेश सावंत संकल्पक श्रीकांत राणे यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा