You are currently viewing आंगणेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचे दिमाखात लोकार्पण

आंगणेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचे दिमाखात लोकार्पण

मसुरे :

 

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत असल्याने सुमारे २ कोटी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाच्या उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप नेते निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सीईओ प्रजित नायर, जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ कुमार अग्रवाल, सेवानिवृत्त उप मुख्य कार्य अधिकारी राजेंद्र पराडकर, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, आंगणे कुटुंबिय अध्यक्ष भास्कर आंगणे, सरपंच सौ मानसी पालव, उपरपंच सौ समीक्षा आंगणे, भाजप नेते राजन तेली, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगले, बीडीओ आत्मज मोरे, पो नि प्रवीण कोल्हे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, बाबा परब, ठेकेदार संतोष कदम आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्या नंतर जिल्ह्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आमचा जिल्हा सर्वच बाबतीत बेस्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यवस्थे बद्दल सकारात्मक विचार ठेवा. व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा बदल शक्य आहे. आगामी काळात लोकसभेच्या महाविजयासाठी आपण आज आई भराडी देवीच्या चरणी नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे घातल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे केले.

देशात आणि राज्यात हिंदूमय वातावरण निर्माण झाले आहे. संस्कृती जपण्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे. वेगवेगळे विकास प्रकल्प जिल्ह्यात येत आहेत. नेव्ही डे नंतर राजकोट किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत आहेत. यातून व्यापार सुद्धा वाढत आहे. सिंधुदुर्ग मधील सर्व किल्यांचे संवर्धन होण्यासाठी भाजपची टीम काम करत आहे. भगवंतगड, रामगड, नांदोस या किल्ल्यावर जमीन मालकांनी जागा देण्याची संमती दिली आहे.बजेट मध्ये या किल्यानं आदर्श पद्धतीने संवर्धन करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. मोरयाचा धोंडा हे देवस्थान सुद्धा विकसित होत आहे, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

मोदी है तो मुनकीन है! या वाक्याची प्रचिती देशवासीय घेत आहेत. राम मंदिर सारखा पाचशे वर्षे प्रलंबित प्रश्न मोदी नि सोडवला आहे. आंगणेवाडी साठी यापुढेही निधीची कोणतीही कमी पडू देणार नाही हा आपला शब्द आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मधील सर्व रेल्वे स्टेशन सुशोभीत करण्यात येत आहेत. विमानतळावर आल्या सारखे वाटावं अस काम करण्यात येणार आहे. सकारात्मक विचार ठेवा असे प्रतिपादन त्यांनी केले.

मागील काही वर्षे जिल्ह्यात बराच निधी आखर्चित रहायचा. अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबद्दल मी माहिती घेतली. एखादा अधिकारी चुकीचे काम करत असेल तर कायद्याने करायचे काम मी करणार व केले सुद्धा आहे. अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्या बाहेर जावे लागेल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगत कार्य अभियंता अजयकुमार सर्वगोड, इंजि. संतोष कदम यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच पत्रकारांचे सुद्धा नेव्ही डे कार्यक्रमात चांगले सहकार्य लाभल्याचे सांगितले.

भाजप नेते निलेश राणे म्हणाले, आजचा दिवस हा आनंदाचा क्षण आहे. राणे साहेबांचे लक्ष जसे आंगणेवाडीच्या विकासासाठी असायचे तसेच लक्ष आई भराडी वरील श्रद्धेमुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आंगणेवाडी वर आहे. आंगणेवाडी मधील कामे गतवर्षी जलद गतीने झाली. कामाची धमक राणे साहेबा प्रमाणे रवींद्र चव्हाण यांच्यात आहे. येथील अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या चव्हाण साहेबांनी पूर्ण केल्या आहेत. आंगणेवाडी मध्ये उभारलेले स्वच्छतागृह पूर्ण राज्यात नसेल. चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर या भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. या भागातील मागण्या पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री कृती मधून काम करत आहेत. पालकमंत्री यांनी दिलेला आदेश पाळला गेलाच पाहिजे अशी कार्यपद्धती आम्हाला अनुभवता येत आहे. आंगणेवाडीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे भाजप नेते निलेश राणे म्हणाले.

मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पालकमंत्री यांचे आभार मानताना मागील सात वर्षे केवळ आश्वासन मिळालेली कामे पालकमंत्री यांनी पूर्ण केल्याचे सांगितले. पालकमंत्री यांची भराडी देवी वर असलेली श्रद्धा त्यांना येथील विकास कामांसाठी प्रेरणा देत आहे. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माळगाव सरपंच सौ.साळसकर, राजेंद्र प्रभुदेसाई, महेश बागवे, सौ सरोज परब, छोटू ठाकूर, दया प्रभुदेसाई, निलेश खोत, राजेंद्र प्रभुदेसाई, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, राजन गावकर, बाबू परब, अध्यक्ष भास्कर आंगणे, काका आंगणे, आनंद आंगणे, अनंत आंगणे, बाळा आंगणे, छोटू आंगणे, दिनेश आंगणे, समीर आंगणे, पपू आंगणे, बाबू आंगणे, नंदू आंगणे, सतीश आंगणे, बाब्या आंगणे, मधुकर आंगणे, संतोष आंगणे, गणेश आंगणे, दिनेश आंगणे, सुधा आंगणे, सचिन आंगणे, तनुराज आंगणे, कुणाल आंगणे, विनोद आंगणे, अक्षय आंगणे, संजय आंगणे, संतोष आंगणे, प्रथमेश आंगणे, पंकज आंगणे, निशिकांत आंगणे, संकेत आंगणे, देवेंद्र आंगणे, कुणाल आंगणे, जयवंत आंगणे, अमोल आंगणे, प्रतीक आंगणे, महेश आंगणे, प्रसाद आंगणे,सागर आंगणे, विनायक आंगणे, प्रकाश आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन बाबू आंगणे तर आभार मधुकर आंगणे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा