सिंधुदुर्गात सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन होणार
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज केली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण होणार असून कामकाजाला गती प्राप्त होणार आहे.
पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी लोकांना संबोधित करत असताना सिंधुदुर्ग जिल्हा यांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने एक मागणी आहे, ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र मंडळ कार्यालयाची स्थापना करण्यात यावी, ती आता पूर्ण करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.
सद्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकच मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहे. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात दापोली पासून दोडामार्ग पर्यंत सुमारे ४०० किलोमीटरचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय सुरू होणार असल्यामुळे बांधकाम विभागाचे कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी विकास निधी अधिक प्राप्त होऊन विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पद्धतीने होतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी सा बां विभागाकडे मिळून सुमारे २ हजार किलमीटर लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी सुस्थीतीत आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. तसेच महत्वाचे व मोठे प्रकल्प जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घोटगे सोनवडे घाटरस्ता बांधकाम तसेच पर्यटन विषयक अनेक कामे वेगाने होतील. तसेच बांधकाम विभागाची कामे अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. पालकमंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांच्या या निर्णयाचे कौतुक केलं जात आहे.
संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*