पिंपरी – (प्रतिनिधी- बाबू डिसोजा कुमठेकर) :
महात्म्यांचं कार्य आणि आपला इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे, यातून ही तरुण पिढी प्रेरणा घेऊन देश आणि समाजाच्या जडणघडणीत योगदान देईल, या हेतूने स्वयंसिध्दा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणे, यांच्या वतीने, बुधवार दि. 24 जानेवारी रोजी प्रतिभा महाविद्यालय चिंचवड येथील विद्यार्थ्यांना, नुकताच प्रदर्शित झालेला, ‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सत्यशोधक’ हा सिनेमा विशाल ई-स्क्वेअर पिंपरी या सिनेमागृहात ५०विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
महाविद्यालयीन शिक्षणा व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांमध्ये जीवन जगण्याचे मूल्य आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान आत्मसात करू नये तर, ज्यांनी आपल्या देशाच्या विकासात अनमोल असे योगदान दिले, असा महात्म्यांना जाणून घेणं त्यांचं कार्य समजून घेणे ही काळाची गरज आहे,असे संस्थेचे अध्यक्ष सविता इंगळे यांनी सांगितले.
सत्यशोधक सिनेमा बोध घेण्यासारखा आहे असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. या अभिनव उपक्रमामध्ये प्रतिभा महाविद्यालयाचे सीईओ डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राध्यापिका आश्लेषा देवोळे, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, कार्याध्यक्ष दिनेश भोसले, सचिव ज्ञानेश्वर भंडारे, कोषाध्यक्ष वर्षा बालगोपाल यांचे सहकार्य लाभले.