कोळोशी ग्रा.पं. येथे 102 वर्ष विर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण
कणकवली
कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत येते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वीर पत्नी नकुबाई लक्ष्मण पटकारे वय 102 हीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
दरवर्षी कोळोशी ग्रामपंचायत येथे आगळावेगळा उपक्रम हाती घेतात असाच या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण विर पत्नीच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामसेवक मंगेश राणे, पोलिस पाटील संजय गोरुले,सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.