You are currently viewing अक्षर

अक्षर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्रो.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*अक्षर*

 

विश्वातील अनादी काळापासून , अक्षरशः अक्षर निर्मिती ! न क्षरती इति

अक्षर ! ज्याचा नाश कधीच होत नाही असे अक्षर ! अक्षर कुठून तयार झाली ? भाषा व लिपी कोणती जरी असली तरी , अक्षर ही प्रथम नाद निर्माण करतात ! नाद हा परत दोन प्रकारचा आहत आणि अनाहत ! आहत नाद

मुखातून वा कोणत्याही आघातजन्य पदार्थापासून निर्मित असतो अनित्य असतो . अनाहत नाद हा स्वर्गीय नित्य असतो . मुखातील जिव्हा ,टाळू , दंत

ओष्ट , नासिक ह्यांच्या आघातामुळे नाद किंवा अक्षर तयार होत असते .

अ उ म – म्हणजेच ओम

हा आकार , उकार , मकार ह्या तीन धातूंपासून तयार झाला आहे.

अक्षर हे मानवाचे प्राण आहे ! बघा हं विचित्र वाटेल पण त्रिकालाबाधित सत्य आहे ! जन्मतः प्रसव झाल्यापासून को s हं ? किंवा को अहं ! ह्या अक्षरांना किती महत्व आहे हे तुम्ही जाणताच . बाळ रडले ह्याचा अर्थ त्याचा पहिला श्वास चालू झाला ! रडणे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडणे , म्हणजेच त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला ! ह्यांचाच अर्थ त्याचे फुफ्फुसे व ह्रदय क्रिया चालू झाली !त्याला जीव प्राप्त झाला ! मंडळी हाच तो अनाहत नाद ! इथे कुठलाच आघात न होता अक्षर तयार झाले ! ईश्वर निर्मित नाद ! अक्षरे देऊन गेला ! प्राण व्यानं उदान ह्या वायूची गती इथे प्राप्त झाली . प्राण ह्रदयस्थित व्यानं फुफ्फुस स्थित, उदान कंठ स्थित !

आपण बोलताना वरील तिन्ही वायूंचे चलनवलन होत असतेच . अपान वायू मलमूत्र विसर्ग होत असताना कार्य करते . तर समान वायू अग्निवर्धन करून अन्न पचन करते. आघात होण्यासाठी वायू व आकाश ह्याची गरज

आघात मुखात होतो व तोंडातील वा श्वास मार्गातील पोकळी किंवा अवकाश अक्षर , शब्द निर्मिती करत असते . माणूस सजीव असेपर्यंत अक्षर आवाज जन्मापासून मृत्यू पर्यंत अव्याहतपणे चालू असते ! आघात अक्षर शब्द हे जेव्हा थांबतील तेव्हा जीव नाहीसा होतो ! जीव जात असताना पण घश्यात घुरघुर लागते व श्वास थांबतो – त्यालाच मृत्यू

म्हणतात !

अनेक अक्षर मिळून शब्द तयार होतो , परा – पश्चन्ती मध्यमा – वैखरी ही त्याचे सूक्ष्म रूपे होत ! बेंबीच्या देठापासून ते कंठातून – मुखापासून बाहेर पडण्याच्या क्रियेला खरतर

फुफ्फुसे व कंठ श्वासपटल मुख ही सर्व कार्यरत असतात ! त्यासाठी वरील तिन्ही वायूचे साक्षात प्राणाचे कार्य अव्याहतपणे चालू असते . शरीरांतर्गत ह्या सूक्ष्म क्रिया असतात . तो सजीव बोलत असतो आहत नादामुळे , मुखातील आघातामुळे ! ह्याच आघातामुळे नादमय संगीत पण तयार होत असते .

अक्षर ही सरस्वती निर्मित ! वाक् – बोलणे , ईश्वरी – अनाहत नाद निर्माण करणारी बीज मंत्र !

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ आं

यरळवष श स हं ळ क्ष ज्ञ

क ख ग ग इत्यादी मुळाक्षरे

काही भाषेत बाराखडी , तर काही भाषेत चौदाखडी !

उदा . कानडी भाषा चौदाखडी ( ह्रस्व आणि दीर्घ ए ) असो .

पाणिनीला मात्र वेगळीच बीजमंत्र मिळाले . शंकराच्या डमरूतुन त्याला चौदा शब्द समुच्चय मिळाला ! त्यावरच पाणिनीने लघुसिद्धांत कौमुदी हे व्याकरण शास्त्राचे नवीन प्रबंध निर्माण केला . जे आजही व्याकरण शास्त्राचे आधारभूत ग्रंथ म्हणून पाहिले जाते . चार चार अक्षरांचा चौदा समूह तयार करून त्यांनी , अक्षरपट मांडला . विस्तार भयास्तव येथे देत नाही ! तरीपण ह्या शास्त्राला नाद संरचना ( phoneticks ) म्हणून जगात मान्यता आहे !

कर्ण बधिर शास्त्रात उपयोग केला गेला ! महत्वाचे म्हणजे

मला अस प्रश्न पडतो की ?

सुदृढ माणूस ऐकू शकतो , बोलू शकतो . मूक बधिरांचं काय ? ? अक्षर समूह म्हणजे शब्द , शब्द समूह म्हणजे वाक्य . नाम क्रियापद कर्म , इत्यादी .

ही मुळाक्षरे, तसेच संगीत शास्त्रातील , “सा रे ग म प ध नी सा ” सप्तसूर कोमल स्वर

” मंद्र मध्य तार सप्तक” ह्यांचा

कंठातून होणारा आघात – नादमय ध्वनी इथे मुळाक्षरे

सप्तस्वरच राज्य करतात !

अस असलेतरी मुखातून आलेला ध्वनी कर्ण पटलावरच कार्य करतात , किंबहुना कर्ण अबाधित असेलतरच ह्याचे ज्ञान होणार .

मुळाक्षरे जशी आहेत तशीच बिजाक्षरे पण वेदानी प्रमाणभूत मानली आहेत . हीच बिजाक्षरे देवांच्या प्राण प्रतिष्ठासाठी ग्राह्य मानली जातात . बाजरातून आणलेला गणपती, घरी पूजेसाठी ज्यावेळी मांडतो त्यावेळी ,

बिजाक्षरानी त्यात प्राण व्यान उदान अक्षरांनी प्रतिष्ठा केली जाते . ती अक्षरे खालीलप्रमाणे .

ओं आं ह्रिम क्रोम् ।

अं यं रं लं वं शम वं सं हं लं

इत्यादी — सर्व अनुनासिक अक्षर

जन्मतः बाळ रडत ते पण अनुनासिक अक्षर !

को ss हं किंवा टँहै टँह्या

ही अशी अनादी अनंत प्रक्रिया सृष्टीत अव्याहत चालू आहेच . बऱ्याच वनस्पतीमध्ये पण ही क्रिया चालू असतेच उदा . केळीचा

कोका ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आवाज येतो . तो अक्षरशः अक्षरांनी . तस बरेच काही अक्षराबद्दल सांगता येईल . ह्या जगात तुम्ही आम्ही असू वा नसू पण अक्षरे ही अबाधित असतील एवढं मात्र खरे !

तेच प्रांजळ सत्य आहे .

 

प्रा डॉ जी आर जोशी

नसलापुर बेळगाव

कॉपी राईट

कर्नाटक

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा