You are currently viewing सोनियाचा दिनु

सोनियाचा दिनु

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सोनियाचा दिनु*

 

२२जानेवारी २०२४, भारताच्या नव्या इतिहासातील सोनियाचा दिवस.

आयोध्या नगरी, श्री रामचंद्र प्रभूंची जन्मभूमी, कर्मभूमी! पितृ वचनाचे संपूर्ण पालन करणारा, राज्याभिषेकाचा यत्किंचितही लोभ न बाळगणारा, एका क्षणात वल्कले धारण करून आनंदाने चौदा वर्षे वनवासात निघालेला श्रीराम!

महर्षी विश्वामित्रांचा शिष्य, मारीच आणि सुबाहु यांचा वध करून ऋषींच्या यज्ञाचे रक्षण करणारा राम, एका चरणस्पर्शाने शिळा अहिल्येचा उद्धार करणारा, शबरी भिल्लीणीची उष्टी बोरे

चाखणारा, लंकाधिपती रावणाचा वध करणारा

राम,पितृप्रेम,मातृप्रेम, बंधू प्रेमाचा आदर्श असा राम, एक पत्नी सीताराम आणि वनवासातून परत आल्यानंतर अयोध्येचा नृपती श्रीराम, केवळ लोकापवादासाठी पतिव्रता सीतेचा त्याग करणारा पतीत पावन श्रीराम!

आज पाचशे वर्षानंतर अशा या रामाची पुण्यभूमी पुन्हा एकदा सजली, सुशोभित झाली. सन १९९० मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी रामाच्या या कर्मभूमीत यवनांनी उध्वस्त केलेले राम मंदिर पुन्हा उभारण्याचा निर्णय घेतला आणि आज चौतीस वर्षांनी भारतवासी राम भक्त आणि सरकार यांच्या अथक प्रयत्नातून भव्य दिव्य असे राम मंदिर शरयू नदीकाठी पुन्हा उभे राहिले. राम लल्लाच्या एकावन्न फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अत्यंत मंगलमय वातावरणात दुपारी एक वाजता संपन्न झाली.

धूप,दीप, आरती, राम नामाचा जयजयकार, मंगल वाद्ये, महा वस्त्रे, आभूषणे या सर्व गोष्टींनी राममूर्ती अत्यंत तेजोमय भासत होती.

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नक्की काय याचे प्रत्यक्ष दर्शन या अयोध्या नगरीत आज घडले. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय नागरिक मोठ्या भक्ती भावाने जमले आहेत, श्री रामा पुढे आपापल्या लोककला सादर करीत आहेत,शोभायात्रा निघत आहेत पण कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही.

भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचे आगमन झाले. मंदिरात त्यांनी श्रीरामाची मनोभावे पूजा केली, आरती केली आणि रामाचा आशीर्वाद घेतला. “आज पाचशे वर्षानंतर रामाचा जयजयकार होत असलेले हे मंदिर केवळ मंदिर नसून ते राष्ट्र मंदिर आहे”

असे त्यांनी नागरिकांना ठासून सांगितले. ” ही प्राणप्रतिष्ठा भारतीय विश्वासाची प्राणप्रतिष्ठा आहे. राम चेतना आहे, राम चिंतन आहे, राम प्रभाव आहे, राम आचार आहे, राम विचार आहे.” मोदीजींचे हे उद्गार भारतीय प्रजेसाठी नवचेतना निर्माण करणारे होते. ” आज देश के लिए निराशा का स्थान नही! पर्वसे लेकर परंपराओतक राम है! राम वर्तमान नही, राम अनंत काल है! अतिशय विश्वासाने मोदीजी बोलत होते. आजच्या या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर

” समर्थ आणि सक्षम दिव्य भारत” बनविण्याची राम लल्लाच्या मूर्ती पुढे त्यांनी सौगंध घेतली.

 

सर्वत्र जल्लोष चालू आहे. घरोघरी रांगोळ्या, तोरणे, दीपमाळा लखलखत आहेत. दीपोत्सव चालू आहे.

आपला सुजलाम सुफलाम भारत पुन्हा संपन्नतेच्या, विकासाच्या आणि एकात्मतेच्या वाटेने चालला आहे हे बघताना ऊर अगदी आनंदाने आणि अभिमानाने भरून आला आहे. कुठे राम कथा, कुठे गीत रामायण, कुठे रामाचे गुणगान आवडीने चालू आहे.

*रघुपति राघव राजाराम*

*पतित पावन सीताराम*

*विष्णूचा अवतार राम*

*नगरी आयोध्या अवतरला*

*आता रामराज्य येणार*

*संपन्न राष्ट्र होणार*

*जय महाराष्ट्र! जय भारत! जय श्रीराम!*

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

 

 

*संवाद मिडिया*

 

*फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी*

 

*Advt Link👇*

————————————————

*कोकणवासियांनो उठा, जागे व्हा*

*सुवर्णरुपी फणसाचे मूल्य ओळखा*

 

*ॲनी* नामक कोण एक *अमेरिकन* महिला भारतात येते, तिची *नजर* फणसावर जाते, बाहेरून काटेरी पण आतून मऊ, मधूर गरे असलेल्या फळाच्या *प्रेमात* पडते, त्यावर *अभ्यास* करते आणि त्याचे विविध गुणधर्म पाहून *अचंबित* होत *करोडो रुपयांची* कंपनी उभी करते.

 

खरोखरच अचंबित करणारी ही घटना आहे. 10-12 वर्षापूर्वी भारतात आलेल्या ॲनी ने फणसाचे व्यावसायीक महत्व ओळखून *द जॅकफ्रूट कंपनी* (The Jackfruit Company) नावाने अमेरिकेतील बोल्डर, कोलोरॅडो शहरात मोठा व्यवसाय उभारला आहे. आज करोडो रुपयांची उलाढाल ही कंपनी करत असून जवळपास 175 करोड रुपयांचं फंडींग या कंपनीला मिळालं आहे. विशेष म्हणजे भारतातून मोठ्या प्रमाणात या कंपनीला फणसाचा पुरवठा होत आहे.

 

*साईराज धोंड* नामक गोव्यातील तरूण *Wakao Foods* नावाचा ब्रॅण्ड तयार करून फणसाचे valu added प्रॉडक्ट्स बनवून देशभरात sale करत आहे.

 

आज जगभरात फणसाला *ग्लोबल फ्रूट* म्हणून संबोधण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात फणसाचा समावेश *दैनंदीन आहारात* केला जात आहे.

 

भारतामध्ये केरळ, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात बऱ्याच प्रमाणात फणसावर काम केले जात आहे, फणसाचा वापर करण्यात येत आहे. *जोसेफ* नामक व्यक्तीने *जॅकफ्रूट 365* नामक कंपनी उभारत फणसाच्या प्रक्रिया व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.

 

कोकणात मात्र आजही फणसाच्या बाबतीत उदासीनता दिसून येते. जवळपास 85 ते 90 टक्के फणस वाया जात आहे. कोकणवासियांनी वेळीच सावध होत त्यावर पावले उचलण्याची गरज आहे.

 

*मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, दमा, नेत्र रोग, त्वचा विकार यासारख्या अनेक आजारांवर फणस उपयुक्त असल्याचे सिध्द होत आहे.*

 

वेगवेगळ्या माध्यमातून फणसाचा आहारात वापर करणे शक्य असल्याने फणसाचे महत्व अधिकच अधोरेखित होत आहे.

 

वेगवेगळ्या पद्धतींनी आणि विविध स्वरुपात वर्षभर टिकणारे, वापरता येऊ शकणारे फणसाचे प्रॉडक्ट्स बनवता येत असल्याने *फणस प्रक्रिया व्यवसाय* आर्थिक उन्नतीचा एक नवा स्त्रोत ठरणार आहे.

 

फणसाचे भविष्यातील महत्व ओळखून लांजा येथील *हरिश्चंद्र देसाई* यांनी 84 पेक्षा जास्त जातीची 1500 झाडांची *फणस बाग* तयार केली आहे. देसाई पिता पुत्र फणसावर मोठ्या प्रमाणात जागृती करत असून त्यावर काम करत आहेत.

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* पण कोकणातील वाया जाणारा फणस जास्तीत जास्त उपयोगात यावा, त्यापासून मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स तयार करणारे उद्योजक, व्यावसायीक घडावेत आणि कोकणात आर्थिक उन्नती व्हावी, उद्योग व्यवसाय उभे राहावेत यासाठी प्रयत्नशील आहे.

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* यासाठीच *फणस प्रक्रिया प्रशिक्षण* शिबिराचे आयोजन वेळोवेळी करत असते. यंदाही *9-10-11 फेब्रुवारी* रोजी *कुडाळ* येथे हे 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे.

 

प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात येत असल्याने प्रशिक्षणार्थीना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, प्रक्रिया समजते, शंकांचं निरसन होतं आणि त्याचा गंध, चव समजल्याने त्यातील विविध पर्याय, संधी यांचा अंदाज येतो.

 

प्रशिक्षण संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया *Jack* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.

 

*फणस प्रक्रिया प्रशिक्षण*

*9-10-11 फेब्रुवारी 2024*

*कुडाळ, सिंधुदुर्ग*

 

*टीम अभिनव*

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =