*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”नारी शक्ती”*
दशरथांना झाले शांती कन्यारत्न चार सूत
रामायणात शांती श्रृंगी ऋषींचे मानावे ऋणIIधृII
अंगदेश नृप रोमपद वर्षीणी होते नि:संतान
भगिनी कौसल्येच्या भेटीला आले उभयतानं
अवखळ शांताच्या बाललीलांनी झाले मोहितII1II
वर्षीणिनी कौसल्येस विचारले आसूसल्या स्वरांत
कौसल्येस याचीले मेधावी कन्या आम्हां द्यावीत
राणीचे द्रवले मन दिले दत्तक मातपित्यानंII2II
राजा नरेशानी शांताला वाढवले प्रेमानं
वेदविद्या शिल्पकलेत केले शांतिला निपूण
कन्या असल्याने त्याकाळी न मिळाले राज्यपदII3II
नरेशांकडे घेऊन आला शेती समस्या ब्राह्मण
नृप शांती संवादात दुर्लक्ष झाले पित्याकडून
स्थितीत इंद्र क्रोधानं दुष्काळ पडला अंगदेशांतII4II
नृप वर्षीणी ऋषींकडे गेले उपाय शोधार्थ
ऋषी श्रृंगांच्या उपायाने सृष्टी झाली हरित
ऋषि श्रृंगांशी शांतीचा विवाह करून दिला नृपानंII5II
तीन पत्नी असताना दशरथ राहिले निपुत्रिक
वसिष्टाचे मार्गदर्शने केला पुत्र कामेष्टी यज्ञ
श्रृंगी ऋषी शांता नेतृत्वानं यज्ञ झाला संपन्न II6II
गर्भवती राहिल्या तिन्ही राण्या पायस प्राषनानं
राजाला झाले चार सुपुत्र शांतेनं फेडले पितृऋण
रामायणांत शांता श्रृंगी ऋषी चे महत्व अनन्यII7II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन410201.
Cell.9373811677.
*संवाद मिडिया*
*फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी*
*Advt Link👇*
————————————————
*कोकणवासियांनो उठा, जागे व्हा*
*सुवर्णरुपी फणसाचे मूल्य ओळखा*
*ॲनी* नामक कोण एक *अमेरिकन* महिला भारतात येते, तिची *नजर* फणसावर जाते, बाहेरून काटेरी पण आतून मऊ, मधूर गरे असलेल्या फळाच्या *प्रेमात* पडते, त्यावर *अभ्यास* करते आणि त्याचे विविध गुणधर्म पाहून *अचंबित* होत *करोडो रुपयांची* कंपनी उभी करते.
खरोखरच अचंबित करणारी ही घटना आहे. 10-12 वर्षापूर्वी भारतात आलेल्या ॲनी ने फणसाचे व्यावसायीक महत्व ओळखून *द जॅकफ्रूट कंपनी* (The Jackfruit Company) नावाने अमेरिकेतील बोल्डर, कोलोरॅडो शहरात मोठा व्यवसाय उभारला आहे. आज करोडो रुपयांची उलाढाल ही कंपनी करत असून जवळपास 175 करोड रुपयांचं फंडींग या कंपनीला मिळालं आहे. विशेष म्हणजे भारतातून मोठ्या प्रमाणात या कंपनीला फणसाचा पुरवठा होत आहे.
*साईराज धोंड* नामक गोव्यातील तरूण *Wakao Foods* नावाचा ब्रॅण्ड तयार करून फणसाचे valu added प्रॉडक्ट्स बनवून देशभरात sale करत आहे.
आज जगभरात फणसाला *ग्लोबल फ्रूट* म्हणून संबोधण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात फणसाचा समावेश *दैनंदीन आहारात* केला जात आहे.
भारतामध्ये केरळ, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात बऱ्याच प्रमाणात फणसावर काम केले जात आहे, फणसाचा वापर करण्यात येत आहे. *जोसेफ* नामक व्यक्तीने *जॅकफ्रूट 365* नामक कंपनी उभारत फणसाच्या प्रक्रिया व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.
कोकणात मात्र आजही फणसाच्या बाबतीत उदासीनता दिसून येते. जवळपास 85 ते 90 टक्के फणस वाया जात आहे. कोकणवासियांनी वेळीच सावध होत त्यावर पावले उचलण्याची गरज आहे.
*मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, दमा, नेत्र रोग, त्वचा विकार यासारख्या अनेक आजारांवर फणस उपयुक्त असल्याचे सिध्द होत आहे.*
वेगवेगळ्या माध्यमातून फणसाचा आहारात वापर करणे शक्य असल्याने फणसाचे महत्व अधिकच अधोरेखित होत आहे.
वेगवेगळ्या पद्धतींनी आणि विविध स्वरुपात वर्षभर टिकणारे, वापरता येऊ शकणारे फणसाचे प्रॉडक्ट्स बनवता येत असल्याने *फणस प्रक्रिया व्यवसाय* आर्थिक उन्नतीचा एक नवा स्त्रोत ठरणार आहे.
फणसाचे भविष्यातील महत्व ओळखून लांजा येथील *हरिश्चंद्र देसाई* यांनी 84 पेक्षा जास्त जातीची 1500 झाडांची *फणस बाग* तयार केली आहे. देसाई पिता पुत्र फणसावर मोठ्या प्रमाणात जागृती करत असून त्यावर काम करत आहेत.
*अभिनव उद्योग प्रबोधिनी* पण कोकणातील वाया जाणारा फणस जास्तीत जास्त उपयोगात यावा, त्यापासून मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स तयार करणारे उद्योजक, व्यावसायीक घडावेत आणि कोकणात आर्थिक उन्नती व्हावी, उद्योग व्यवसाय उभे राहावेत यासाठी प्रयत्नशील आहे.
*अभिनव उद्योग प्रबोधिनी* यासाठीच *फणस प्रक्रिया प्रशिक्षण* शिबिराचे आयोजन वेळोवेळी करत असते. यंदाही *9-10-11 फेब्रुवारी* रोजी *कुडाळ* येथे हे 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे.
प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात येत असल्याने प्रशिक्षणार्थीना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, प्रक्रिया समजते, शंकांचं निरसन होतं आणि त्याचा गंध, चव समजल्याने त्यातील विविध पर्याय, संधी यांचा अंदाज येतो.
प्रशिक्षण संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया *Jack* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.
*फणस प्रक्रिया प्रशिक्षण*
*9-10-11 फेब्रुवारी 2024*
*कुडाळ, सिंधुदुर्ग*
*टीम अभिनव*
8767473919
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क *8356929616*