You are currently viewing स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्याच्या ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व 12 वी तसेच 12 नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2023-24 या शैक्षणीक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने  अर्ज  करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

             या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्यी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. जिल्हा ठिकाणातील  हद्दीपासून 0.5 कि.मी परिसरातील असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच  इ.11 वी, 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील. जिल्हानिहाय अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्याना लाभ द्यावयाचा आहे ही संख्या निश्चित केली आहे. जास्त संख्येने अर्ज सादर झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.

            योजनेबाबतची माहिती व अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दि. 13 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयात  योजनेविषयीच्या अटी व शर्तीची माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या योजनेचा  अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग तसेच महाविद्यालयांच्या नजीकच्या शासकीय वसतिगृहात विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

             या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाला भोजन भत्ता रु. 25 हजार, निवास भत्ता रु.12 हजार व निर्वाह भत्ता रु. 6 हजार असे एकूण रु. 43 हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु.5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी रु. 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. गरजू विद्यार्थ्यानी योजनेचे अर्ज भरुन व अर्जासोबत दिलेल्या सूचीमधील आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 जानेवारी 2024 अखेर पर्यंत  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग, महाविद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये समक्ष, टपालव्दारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (02362 228882) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + five =