You are currently viewing जय श्री रामा रघुनंदना

जय श्री रामा रघुनंदना

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जय श्री रामा रघुनंदना*

 

जय श्री रामा रघुनंदना

नाम तुझे घेता,

हर्ष होई रे माझ्या मना

सरती सार्या चिंता.

 

हे श्री रामा,तू सौख्यदाता

तवरुपे येई

आनंद , हर्षिती मातापिता

सुख दारी येई.

 

तव बाललीला कौतुके पाही

कौसल्या माता

चंद्राचा हट्ट प्रतिबिंबे द्यावी तुज

हर्षती मातपिता.

 

अयोध्येचा राजपुत्र तू रामा

तारिसी सार्यांना

धन्य धन्य ते माता पिता रे

सुख देशी सर्वांना.

 

मातपित्या वचना जागशी रामा

अयोध्या भूषणा,

सत्यवचनी,धनुर्धारी हे श्री रामा

पाळिसी वचना.

 

स्वयंवरे शिवधनुष्य शक्तीशाली

पेलुनि वर जिंकशी,

सौंदर्यवती जानकी तुजभाळली

वरले रामा तुजशी.

 

संपन्न हो विवाहसोहळा नेत्रदीपक

अयोध्या सजली

नक्षत्रासारखी रामसीता राजाराणी

निरागस लाभली.

 

परी विधिलिखित वेगळेच घडले

दृष्ट मंथरेची

ऐनवेळी घात केलाराज्यभिषेकी

वचने स्मरु दिली.

 

कैकयीनेडाव साधला भरतास

राज्यभिषेकी हट्ट

रामसीता वनवासी धाडिले परी

बंधुप्रेम‌ ते घट्ट.

 

रामपादुका ठेऊनी सिंहासनीभरत

साश्रू नयने निरोप

रामसीता,लक्ष्मण निघालेवनवासी

अयोध्येस सोडत.

 

कैसा लोटलाकाळदुःखाचामाहोळ

वनवासी सीता हरण

दुष्टचक्रेघातझालाचौदावर्षेअन्याय

भस्मसात रावण

परमभक्त हनुमान भेटला तुज

रामा,वानरसेना

मदतीस धाऊनि येती सागरावरी

शीघ्र सेतू बांधाया.

 

लंकादहने शीघ्र सोडवी पतिव्रता

सीता माऊली

मारुतीराया,बंधूलक्ष्मण,वानरसेना

सहकार्या आली.

 

रघुपतीराघव राजा राम, जान्हवी

येती अयोध्येस

सुंदर सोहळा राज्यभिषेकाचा होई

आनंदी जनतेस.

 

परि डंखविषारी डसला राज्यास

होत्याचे नव्हते

आनंदी जनता शोकाकूल सीतेस

कलंक जोडी नाते.

 

अग्निदिव्ये जरी पवित्र सीतामाता

धरणीच्या उदरात

एकवचनी,एकपत्नी सत्यरामराजा

पुन्हा संघर्षात.

 

सदाचारी रामराज्य हे न्यायालय

परि नियतीच्या

फेर्यात अडकले श्रीरामाचे भाग्य

त्यागिले सर्वसौख्य.

 

जनहितार्थ झटले श्रीप्रभूरामराया

एकबाणी धनुर्धारी,

तेजस्वी रामराया अवतरले‌भूवरी

सातव्या अवतारी.

 

परि आज अवतरले पुन्हा एकदा

दशरथपुत्र राम,

हर्षोन्मादाने‌ फुललीभरतभूचीधरा

रघुनंदन सियाराम.

 

जल्लोष हास्वाभिमानाचा,रामाचा

सौख्यानंद न्यायाचा

रामराज्य येई भुवरीनकुठेअन्याय

प्रकाश रामतेजाचा.

 

अयोध्या सौभाग्यशाली भारताची

सुंदरतेची शान

खुलेभाग्यभारतभूच्याभक्तजनांचे

क्षणोक्षणी वर्धमान.

🙏 श्री रामार्पण🙏🌹🌹

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई विरार

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा