सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट तसेच अफवा पसरवू नयेत – जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करा
सिंधुदुर्ग
अलीकडे सोशल मिडियावर घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हामध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे. सोशल मिडियावर सायबर पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग मार्फत २४ तास निगराणी ठेवण्यात येत असून सोशल मिडियाद्ववारे कोणत्याही धर्माबदल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तरी कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच सोशल मिडिया वर कोणत्याही धर्माबदल अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी. Facebook, Twitter, Instagram, Koo व Youtube च्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश किंवा आक्षेपार्ह संदेश अथवा व्हिडीओ प्रसारित वा पोस्ट करण्यात येऊ नयेत.
सर्व जातीय धर्माच्या आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येईल व अशा घटनांवर सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे कडक धोरण स्वीकारले जाईल. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.