You are currently viewing नांदगाव येथे हायवे व ठेकेदार कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू.

नांदगाव येथे हायवे व ठेकेदार कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू.

कणकवली
हायवेच्या जवळच घर असल्याने कंपनीने उत्खनन करून माती काढल्याने झाडे कोसळून घरालाही धोका निर्माण झाला असून याबाबत वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी करूनही कोणीच दखल न घेतल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून नांदगाव तिठा येथील रोहन नलावडे कुटूंबिय या ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सूरू केले आहे. दरम्यान या नांदगाव येथील उपोषण स्थळी खारेपाटण सार्व.बांधकाम चे उपअभियंते डी.जी. कुमावत यांनी भेट देत नलावडे कुटूंबियांच्या समस्या जाणून घेवून चर्चा झाली परंतू या चर्चेत त्यांचे समाधान न झाल्याने उशिरापर्यंत साखळी उपोषण सुरू होते.


यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर, राष्ट्रवादी सेवादलाचे रूपेश जाधव, बाळा मोरये, ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर, यांनी आंदोलनाच्या ठीकाणी भेट देत पाठींबा दिला. रोहन नंलावडे यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंते सिंधुदूर्ग यांना लेखी स्वरूपाचे निवेदन दिलें होते.
या निवंदनात त्यांनी म्हटले आहे की, गट नं.२३५३-१/२ अ ही जागा माझी वैयक्तीक मालकीची असून यात माझे राहते घर आहे. हायवे संपादन लागूनच झालेले आहे. यात संबधीत हायवे ठेकेदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता माझ्या घराच्या बाजूने उत्खनन केलेले आहे. त्यातील झाडे व मालमत्तेची नासधुस झालेली आहे. या संबधी आपण वारंवार प्रशासकीय अधिकारी यांच्या र्पयंत मी स्वत: प्रत्यक्ष भेटून दाद मागीतली होती. पण अजून पर्यंत कोणी दखल न घेतल्याने मला कुटूंबियांन सोबत साखळी उपोषणास बसावे लागत आहे. तसेच माझ्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता ही राहीलेला नाही. माझ्या घरात वयोवृध्द माणसे राहत असून त्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच ठेकेदार कंपनीने संपादीत जागेच्या बाहेर सुध्दा येत आमच्या जागेत उत्खनन करून माझे पूर्ण पणे नुकसान केले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे याबाबत मला न्याय न मिळाल्यास दिनांक १६/१२/२०२० पासुन साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे नमुद केले होते. या अनुषंगाने आज सकाळी १० वा.पासून साखळी उपोषणास सुरूवात झाली होती. यावेळी कणकवली पोलीस ठाणेहून आर.के.पाटील, आर.आर.राऊत, प्रथमेश नरसाळे बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा