सात-आठ वाहनांना धडक
पुणे :
पुण्यात वाहतूकीसाठी धोकदायक ठरणाऱ्या नवले पुल येथे आज पुन्हा अपघात झाला आहे. टॅ्कने जोरदार धडक दिल्याने 7 ते 8 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. अपघतानंतर ट्रक डाईव्हर फरार झाला असून क्लिनर ला संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
साधारण सुमारे 12.15 च्या आसपास कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने 7-8 वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 7 कार एक दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात रस्त्याच्या कडेला बसलेल्या महिलेच्या अंगावर स्फिट कार गेल्याने किरकोळ जखमी झाली आहे.
नशीब बलवत्तर म्हणून बचावले
बालेवाडी स्टेडियम येथे क्रिकेट खेळण्यासाठी निघालेली 7 ते 8 लहान मुलांच्या बॅलेरो कारने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की गाडी रस्त्याच्या मधील डिव्हाईडवर जाऊन अडकली. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि मरणाच्या दारातून थोडक्यात बचावले. अचानक झालेल्या या अपघातामुळे लहान मुले धास्तावली आहेत.
दरम्यान, अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस, पुणे वाहतूक पोलिस दाखल झाले असून. रस्त्यावरील गाड्या हटवून रस्ता मोकळा केला आहे.