मुंबई –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावच्या मंडळींनी एकत्रित येऊन प्रगतीदायक कामगिरी बजावली असून ते पाहता प्रगती बरोबर मन प्रसन्न राहणे महत्त्वाचे आहे. तेचं आजच्या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून होत असताना दिसून येत आहे.असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी रामेश्वर हायस्कूल सांताक्रूझ येथे आयोजित तिरोडा ग्रामविकास मुंबईस्थित कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन प्रसंगी गौरव उदगार व्यक्त केले. प्रारंभी प्रभू श्रीराम तैलचित्राचे अनावरण व पूजा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यावेळी गावचे सरपंच अनिल केरकर, उपसरपंच संदेश केरकर, माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, मंडळाचे अध्यक्ष नामदेव केरकर, माजी अध्यक्ष सत्यवान आडारकर, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, कमलाकर माणगावकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण भोसले पुढे म्हणाले की, या गावचा सूपूत्र असून आपण सर्वजण बरीच समाज उपयोगी कामे मिळालेल्या देणगीतून करीत असताना मंडळाचे कार्य हे पारदर्शक असून ज्या मुंबईकर मंडळींना इच्छा असूनही गावी येता येतं नाही. अशाकरिता देवी माऊलींचे दर्शन घडवून आणलं जाते यांने खरंच मी सुखावलो असे नमूद केले. यावेळी मंडळाचे जेष्ठ सल्लागार शरद गोडकर, छाया बोरकर या दांपत्याच्या योगदानाबद्दल शाल,श्रीफळ, देवी माऊलींची प्रतिमा, आणि सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ माजी अध्यक्ष सत्यवान आडारकर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा मरणोत्तर वारसांचा गौरव करण्यात आला. उद्याच्या तरूणांना उमेद देण्यासाठी कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान आडारकर मार्गदर्शन केले. यावेळी संजय आडारकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील संकल्पना विषद केल्या.याप्रसंगी नंदकिशोर मेस्त्री आणि सहकारी यांनी गीतरामायण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात प्रावीण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीचं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. यावर्षीही मनोरंजनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पेडणेकर यांनी अतिशय सुबक शब्दात केले.