You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावर बोलोरे गाडीचा टायर फुटून अपघात..

मुंबई-गोवा महामार्गावर बोलोरे गाडीचा टायर फुटून अपघात..

कणकवली
मुंबई गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे बोलेरो गाडीचा टायर फुटून अपघात झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बीड मधील पर्यटक कुडाळच्या दिशेने जात असताना, हा अपघात घडला आहे. यामध्ये १ जण किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड मधील पर्यटक कुडाळ येथे आपल्या बोलेरो गाडीतून जात असताना, वागदे डंगळवाडी येथे गाडीचा अचानक टायर फुटला. गाडी स्पीडला असल्याने गाडी डीवायडर आपटुन परत डाव्या साईटला असलेल्या रेलिंगवर मागील बाजुला जाऊन आदळली.‌ पुन्हा महामार्गाच्या डीवायडर वर चढल्याने तेथेच फसली. सुदैवाने येथे पत्र्याचे रेलिंग असल्याने बचावले. अन्यथा १५ फूट दरीत कोसळुन मोठी दुर्घटना घडण्यावाचुन बचावली.

अपघात घडताच वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, नागेश आमडोस्कर, सत्यवान तोरस्कर, अनंत आमडोस्कर, सुहास तावडे तसेच वागदे ग्रामस्थानी गाडी बाजुला करत वाहतुक सुरळीत केली. दरम्यान कसाल वाहतुक पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 10 =