You are currently viewing शिक्षक भारतीच्या वतीने उद्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

शिक्षक भारतीच्या वतीने उद्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

तळेरे

नोव्हेंबर 2005 नंतर शासनसेवेत आलेल्या कर्मचा-यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये समाविष्ट करण्यासाठी CSRF फॉर्म भरणेची अंमलबजावणी माध्यमिक शिक्षण विभागाने चालू केलेली आहे.संदर्भिय या योजनेसंदर्भात शिक्षक कर्मचाऱ्यांचे निराकरण होत नसल्याने न्यायी मागण्यांसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने उद्या बुधवार दि.३०रोजी दु. १२ते ४ या वेळेत जिल्हा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर व गिरीश गोसावी यांनी दिली.
सातत्याने जिल्हा शिक्षण विभाग व वेतन पथक (माध्य) कार्यालयाकडे सदर कर्मचा-यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षक भारतीच्या मार्फत वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला आहे. पण अद्याप कसलेही समस्यांचे निराकरण न करता उलट नियमित वेतन बिल न स्वीकारण्याचा मार्ग आपण अवलंबलेला आहे.

कोविडच्या या महामारीच्या काळात माध्यमिक शाळांचे वेतन बिल न स्वीकारण्याचे धोरण अवलंबल्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबना होत आहे. कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटना बुधवार दि. ३०/०६/२०२१ रोजी दु.१२ते सायं.४ यावेळेत जिल्हा मुख्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. कोविड १९ बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून सदरचे आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोगो:- शिक्षक भारती

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =