सावंतवाडी मोती तलावातील असंख्य मासे मृत्युमुखी
पाण्यामध्ये हिरवा तवंग असल्यामुळे पाणी पूर्णपणे खराब; पालिकेने त्वरित लक्ष देऊन ते साफ करावे – सामजिक कार्यकर्ते श्री.रवी जाधव
सावंतवाडी.
सावंतवाडी येथील मोती तलावामध्ये असंख्य मासे मृत्युमुखी पडले सापडले आहेत.त्यामुळे तळ्या सभोवतालच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.पालिकेने त्वरित लक्ष देऊन ते साफ करावे,अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सामजिक कार्यकर्ते श्री.रवी जाधव यांनी केली आहे.दरमयान गेल्या चार-पाच दिवसात मोती तलाव मध्ये माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून पाण्यामध्ये हिरवा तवंग असल्यामुळे पाणी पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे त्यांना पुरेसं ऑक्सिजन पुरवठा मिळत नसल्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचेही रवी जाधव यांनी म्हटलं आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की मोती तलावमध्ये असंख्य मासे हे मृत्युमुखी पडले असून दुर्गंधी पसरले आहे. तलावामध्ये आलेल्या हिरवळ तवंगामुळेच हे मासे मृत्युमुखी पडले असून पालिकेने दिवसातून दोन वेळा तरी बोट फिरून पाण्यावरचा तवंग कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी देखील सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली आहे.