You are currently viewing कारसेवकांची हिम्मत आणि कार्य आत्मसात करण्याची गरज; आमदार नितेश राणे

कारसेवकांची हिम्मत आणि कार्य आत्मसात करण्याची गरज; आमदार नितेश राणे

कारसेवकांची हिम्मत आणि कार्य आत्मसात करण्याची गरज; आमदार नितेश राणे

* हा आजचा दिवस कार सेवकांमुळेच

*कणकवलीत कार सेवकांचा आमदार नितेश राणे यांनी केला सत्कार

*राम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका आणि अयोध्या राम मंदिर प्रतिकृती दिली भेट

कणकवली
अयोध्येत राम मंदिर आणि देशात राम उत्सव हा आजचा दिवस कार सेवकांमुळे आहे. त्यांचे कार्य आणि हिम्मत प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे आणि जेव्हा पुन्हा काशी मथुरा येथून हाक येईल तेव्हा कार सेवा देण्यासाठी तयारी ठेवाली पाहिजे असे आवाहन कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी केले.
अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार सेवकांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार,संघाचे जिल्हा कार्यवाह लवु म्हाडेश्वर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,प्रकाश गोगटे, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाहाच्या विरोधात जावून हिंदू समाजासाठी,धर्मासाठी केलेली कामगिरी फार मोठी असते.आज जो सत्कार केला तो कार सेवकांचा कार्याचा आणि गुणांचा आहे. प्रभू श्रीराम म्हणजे एक ऊर्जा आहे. त्यांना पाहून ऊर्जा मिळते.आज जे वातावर पाहतो आहोत.तो कार सेवकांचे बलिदान आणि त्यागाची हे फळं आहे अशोक सिंगल, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, स्व.बाळासाहेब ठाकरे अशा अनेक नेत्यांनी या साठी पुढाकार घेतला.त्याचा सुद्धा या यशात सिंहाचा वाटा आहे.
राम मंदिर राजकीय इच्छा असती तर या पूर्वी केले असते मात्र ती नव्हती. जेव्हा भाजप ची सत्ता आली आणि मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मंदिर वही बनायेंगे आणि भव्य मंदिर बानायेंगे असे जाहीर करून मोदी साहेबांनी ते उभारून दाखविले.मात्र काँग्रेस ची सत्ता असताना राम जन्म भूमीवर प्रश्न निर्माण केला होता. वक्फ बोर्ड जी भूमिका घेते तीच भूमिका आता उध्दव ठाकरे घेत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर साठी जे केले ते सर्व उध्दव ठाकरे यांनी घालविले आहे.
आक्रमणे आजही सुरू आहेत मात्र त्याचे स्वरूप वेगळे आहे. त्यामळे हिंदू राष्ट्र म्हणून सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी यांचीच सत्ता हवी हे लक्षात ठेवा आणि हिंदू धर्मा साठी सर्वांनी एक जुट ठेवा. असे आवाहन केले.
डॉ. मिलिंद कुलकर्णी
१५२८ साली राममंदिर चा संघर्ष झाला.अनेक वेळा संघर्ष झाला.अनेक राम भक्तांना आहुती दिली. यात इग्रज काळात दोन्ही कडील प्रमुखांना समेट केला त्यावेळी इंग्रजांनी फासी दिली.अशा पद्धतीने राम जन्म भूमीचा प्रश्न नेहमीच वादात ठेवला गेला मात्र आता तो वाद संपला आहे.राम हा भारता चा सर्वस्व आहे. अशा प्रकारे रामाची स्थापना झाली.
माजी आमदार अजित गोगटे
पहिल्या कार सेवेत आम्हाला त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यांनी खूपच त्रास दिला. रेल्वे,गाड्या इतर वाहने आडविली. आम्हाला अटक केली. जेवण सुद्धा दिले नाही अखेर झाशी मधून जेवणे दिली. मात्र ठरलेल्या दिवशी मुण्या याव्यात असे कार सेवक त्या ठिकाणी पोचले आणि परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली.त्यावेळी गोळीबार केला आणि दोन लोक जे बाबरी मशीद च्या घुमटावर चढले त्यांना गोळ्या घालण्यात आले.
*कार सेवक ,विद्याधर माळगावकर
देवगड तालुक्यातील कार सेवकांची जबाबदारी आमच्यावर होती तेव्हा ९० मध्ये राहिलेले काम ९२ मध्ये मी आणि दादा जुवटकर, दीपक तारी,दत्ताराम घाडी यांनी आत मध्ये घुसून राहिलेले काम पूर्ण केले होते. बाबरी पाडली होती.
*माजी आमदार प्रमोद जठार
पोलिसांचा पहारा घरावर होता तरी पोलिसांचा डोळा चुकवून अयोध्येला गेलो. छत्रपती शिवाजीराजे महाराजांना सुद्धा दुःख होते. त्यांनी अयोध्या आक्रमणाने मुक्त करणार असे स्वप्ने होते. ते आज सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले.बाबराने देवळातील देव आणि घरातील स्त्री यांना बाटवायचे काम केले. हिंदू देवळे राहतील तो पर्यंत देशात लोकशाही असेल.
अवधपुरी की धूळ सही म्हणून प्रभू श्रीराम श्रीलंकेत विजय मिळवून अयोध्येत आले.असे त्यांनी सांगितले.
* संघ कार्यवाह लहू महाडेश्वर
स्वातंत्र्य मिळाले मात्र राम मंदिर होईना त्यासाठी ७५ वर्षे जावी लागली आणि आज २०२४ उजाडले. त्यासाठी तीन लाख कार सेवकांनी आपले रक्त सांडले आहे.गंगा यात्रा,राम शिला अशा अनेक यात्रा झाल्या.आणि ९०/९२ च्या कार सेवा फारच महत्वाच्या होत्या.न्यायाचा लढा पुढे लढवा लागला.आणि २०१९ मध्ये निर्णय आला. आपण सर्वांनी दिलेला एक रुपया आणि दिलेली विठ या राम मंदिर साठी लागली आहे त्यामुळे हे सर्वांचे मंदिर आहे.हे राष्ट्र मंदिर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा