You are currently viewing अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त कणकवलीत पटकीदेवी मित्रमंडळातर्फे शोभायात्रा…

अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त कणकवलीत पटकीदेवी मित्रमंडळातर्फे शोभायात्रा…

अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त कणकवलीत पटकीदेवी मित्रमंडळातर्फे शोभायात्रा…

कणकवली

अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त पटकीदेवी मित्रमंडळातर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा जयघोष करीत वातावरण राममय केले.
रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठनेनिमित्त कणकवली शहर तालुक्यात मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. यानिमित्त शहरातील पटकीदेवी मित्रमंडळातर्फे पटकीदेवी ते पटवर्धन चौक अशी शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान बाजारपेठेतील दुकानदार व घरोघरी लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी जय श्री रामाचा जयघोष करण्यात आला. मंडळातर्फे श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाचा चलचित्र देखावा काढण्यात आला. हा देखावा लक्षवेधी ठरला. यामध्ये पटकीदेवी मित्र मंडळाचे युवक सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा