You are currently viewing आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे: यशवंत शितोळे

आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे: यशवंत शितोळे

*आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे: यशवंत शितोळे*

वैभववाडी

विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये जर आपले उज्वल करिअर घडवायचे असेल तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून व सर्व संकटांवर मात करून करिअरच्या सर्व संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष मा.श्री. यशवंत शितोळे यांनी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ दिनांक २० जानेवारी,२०२४ रोजी संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा. श्री. यशवंत शितोळे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल करिअर संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली अशा सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून महाविद्यालयामध्ये पार पडत असणाऱ्या अशा विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा या विद्यार्थ्यांना आपल्या पुढील आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी प्रेरक ठरतात व अशा स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाने करत राहावे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता लेख सर्वांसमोर सादर केला.
शिक्षण संस्थेचे सचिव श्री. शैलेंद्र रावराणे यांनी आपल्या देशातील अनेक यशस्वी खेळाडूंची उदाहरणे देऊन संबोधित केले. शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.विजय रावराणे यांनी ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या वेळी चांगला प्रयत्न करून त्यांनीही बक्षीसे मिळवावी असे सांगितले.
महाविद्यालयाचा क्रीडा व सांस्कृतिक हेमंत युवा महोत्सव दिनांक ४ जानेवारी ते २० जानेवारी २०२४ या दरम्यान महाविद्यालयातील क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या युवा महोत्सवामध्ये विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा, फनी गेम्स, ट्रॅडिशनल डे, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे विविध उपक्रमांचे आयोजन आले होते.
शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये तसेच वर्षभरामध्ये ज्या ज्या विविध स्पर्धां मध्ये विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांचा विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
या वार्षिक पारितोषिक समारंभ दरम्यान महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री.शैलेंद्रजी रावराणे, सहसचिव माननीय श्री. विजय जी रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष मा. सज्जनकाका रावराणे, विश्वस्त मा. श्री. शरदचंद्र रावराणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी विद्यार्थी मा. श्री. सुधीर नकाशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर, अहवाल वाचन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. एस. बी. पाटील, व उपस्थित सर्वांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी. एस. बेटकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा