You are currently viewing मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल

मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल

*मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल*

पिंपरी (दिनांक : २१ जानेवारी २०२४)

मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देताना ॲड. रामराजे भोसले म्हणाले की, “पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे पोक्सो (POCSO ) न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला, तसेच भूमिपूजन समारंभ आज रविवार, दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांच्या हस्ते तसेच माननीय न्यायमूर्ती संदीप मारणे, माननीय न्यायमूर्ती डॉ. आरिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने मोरवाडी येथील न्यायालयामध्ये दोन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दोन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय लवकर सुरू करावेत, अशी मागणी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आणि त्यापूर्वी पत्राद्वारे करण्यात आली. तसेच मोशी येथे होणाऱ्या न्यायसंकुलाचे भूमिपूजन सुद्धा लवकर करावे, अशी पत्राद्वारे विनंतीदेखील करण्यात आली होती. त्यावर माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये आणि भूमिपूजन समारंभाच्या आपल्या मनोगतात उल्लेख करीत मोशी येथे होणाऱ्या न्यायसंकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्वच परवानग्या मिळाल्या असून, फक्त पर्यावरण संदर्भातील परवानग्या (ENVIRONMENT CLEARANCE) मिळणे बाकी आहेत; परंतु त्याही लवकरच मिळतील, असे या कार्यक्रमप्रसंगी न्यायमूर्ती मोहिते यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. अतिश लांडगे, ॲड.‌ मानसी उदासी, ॲड. बालाजी देशमुख, ॲड. विवेक राऊत, ॲड. शुभम खैरनार उपस्थितीत होते.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा