काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत
शासनाकडून झालेल्या तपासणीमुळे नाही तर रेशनधान्य माफियांमुळेच सांगवे सोसायटी बदनामी झाली आहे.गोरगरीब नागरिकांना आलेले धान्य काळ्याबाजारात विकण्याच्या उपक्रमात सांगवे सोसायटीने कणकवली तालुक्यात काय सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबर काढला आहे.भात खरेदी हा राज्य सरकारचा उपक्रम आहे आणि स्वस्त कांदे विक्री ही तुमच्या नेत्यांनी की सांगवे सोसायटीने यात खरे काय .राहता राहिला भिरवंडे, नाटळ ,हरकूल खुर्द व नाटळ या संस्थांच्या रास्त धान्य दुकानांच्या तपासणीचा विषय,या संस्थांची खुशाल तपासणी करा,वाटल्यास तुमचा ऑडिटर नेमा परंतु अशा मागण्या करून सांगवे सोसायटीची तपासणीतुन सुटणार नाही हे मात्र लक्षात ठेवा.
सांगवे गावातील गरीब 125 कुटुंबाना वाटप करण्यासाठी देणगीदारांनाकडून धान्य गोळा केले होते असे सांगता मग त्या धान्याच्या वाटपासाठी देवगड वरून टेम्पो का मागवला, अहो सोसायटी चेअरमन चा टेम्पो नव्हता तर कनेडीतील कोणाचाही टेम्पो मिळाला असता, फुकटचे धान्य वाटपासाठी विकतचा आणि तोही देवगड वरून मागवलेला टेम्पो का हवा होता तेही लोकांना समजुदेत. किती खोट बोलाल, जनता सर्व समजून आहे.कनेडी परिसरात गेली काही वर्षे कोणाची दहशत होती हे जरा तुमच्या मनाला विचारा आणि हो एक बर झाल तुम्हाला आता दहशतवादाची भीती वाटू लागली म्हणजे तुमचा दहशतवाद संपला म्हणायचा, तुमच्या शिव्या, दादागिरी,अंगावर जाणे,दातओठ चावणे हे कारनामे लोक विसरलेले नाहीत.एक बरे झाले आपला दहशतवाद आता कनेडी परिसरातून संपला याची जाणीव तुम्हाला झाली. आपल्यालाही जाब विचारणारे कोण तरी या भागात आहेत तेव्हा सी सी टी व्ही बसवाच सत्य बाहेर यायलाच हवे,कारण निवडणूक काळात रात्री अपरात्री या भागात कोणाच्या गाड्या फिरतात हे तरी पोलिसांना समजेल.