You are currently viewing सावंतवाडी राजवाडा येथे 24 ते 27 जानेवारी दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी राजवाडा येथे 24 ते 27 जानेवारी दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी राजवाडा येथे 24 ते 27 जानेवारी दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
दशावतार महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

दशावतारी महोत्सव दि. २४ जानेवारी २०२४ ते २७ जानेवारी २०२४ असून वेळ : सायं. ६.३० ते ८.००, रात्रौ ८.३० ते १०.०० अशी असणार आहे.
ठिकाण: राजवाडा – सावंतवाडी

दिव्यलोकीचा आभास निर्माण करणारी, इंद्रधनुष्यी रंगांची उधळण करणारी रंगभूषा व वेशभूषा, उत्कृष्ट खटकेबाज उत्स्फूर्त संवादाची
जोड लाभलेला रांगडा प्रत्ययकारी अकृत्रिम अभिनय, पखवाज किंवा तबला पायपेटी अन् झांजेची लयकारी साथ लाभलेले संगीत या
वैशिष्ट्यांसह भाविक लोकरंगभूमीवर अवतीर्ण होणारा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लोककलाविष्कार म्हणजे आपला दशावतार !
महाराष्ट्रासह हैद्राबाद, उडुपी, दिल्ली, गुरगाव अशी अटकेपार आपली कलापताका दशावतार मंडळानी फडकावली आहे. ही जुनी
पारंपरिक दशावतार कला जिवंत ठेवण्यासाठी, तिचे जतन करण्यासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे
आकर्षित व्हावा या उद्देशाने आमच्या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमसावंत खेमसावंत भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने निवडक पारंपरिक तथा आजच्या
दशावतार मंडळांचा दशावतार महोत्सव, बुधवार दिनांक २४ जानेवारी ते शनिवार दि. २७ जानेवारी २०२४ रोजी दररोज सायंकाळी ठीक
६.३० ते १०.०० या वेळेत सावंतवाडीतील राजवाड्याच्या निसर्गरम्य, सुंदर वातावरणातील पटांगणात संपन्न होत आहे. समस्त कलाप्रेमींनी
आपल्या लोककलाकारांच्या लोककलाविष्काराचा आनंद घ्यावा.

बुधवार दि. २४ जानेवारी २०२४ सायं. ५.३० ते ६.३० महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सायं. ६.३० ते ८.०० टप्केश्वर तीर्थक्षेत्र, जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस-दांडेली तर सायं. ६.३० ते ८.०० श्री लक्ष्मीपूजन, वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांच्या प्रयोग होणार आहे

गुरुवार दि. २५ जानेवारी २०२४ रोजी
सायं. ६.३० ते ८.०० अजिंक्य मणी, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण व सायं. ६.३० ते ८.०० वा. पराशक्ती दहन, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

शुक्रवार दि. २६ जानेवारी २०२४
सायं. ६.३० ते ८.०० शिवमहिमा, आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली व त्यानंतर सायं. ६.३० ते ८.०० वा. अघोर लक्ष्मी, वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

शनिवार दि. २७ जानेवारी २०२४
सायं. ६.३० ते ८.०० वा. मीनाक्षी सुंदरेश्वर, दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले, रात्रौ ८.३० ते १०.०० गणेश मंगल युद्ध, नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळ, मोचेमाड यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
व त्यानंतर रात्रों १०.०० ते १०.३० महोत्सवाचा समारोप होणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा