You are currently viewing वीज ग्राहक संघटना दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी सुभाष दळवी तर सहसचिवपदी भूषण सावंत

वीज ग्राहक संघटना दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी सुभाष दळवी तर सहसचिवपदी भूषण सावंत

वीज ग्राहक संघटना दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी सुभाष दळवी तर सहसचिवपदी भूषण सावंत

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वीज ग्राहक संघटना स्थापन केली जात असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच दोडामार्ग तालुक्यात शुक्रवारी दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करून सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नव्याने स्थापन केलेल्या दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.सुभाष लक्ष्मण दळवी, (पाळये), सचिव दशरथ विठ्ठल मोरजकर (उसप), सहसचिव पदी श्री.भूषण सुधाकर सावंत (आंबेली), उपाध्यक्ष श्री.संतोष दिनकर नानचे (दोडामार्ग), श्री.सुरेंद्र साबाजी सावंत भोसले (तळकट), श्री.गणपत ज्ञानेश्वर डांगी (भेडशी), श्री.संजय कृष्णा गवस (पिकुळे), खजिनदार – प्रशांत वसंत नाईक (दोडामार्ग) यांची निवड करण्यात आली.

दोडामार्ग बाजारपेठ येथील पिंपळेश्वर सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग नगरसेवक संतोष नानचे, व्यापारी संघाचे सागर शिरसाट, दशरथ मोरजकर आदी उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या बैठकीत खालील प्रमाणे कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला.

यात प्रामुख्याने तालुका समन्वयक पदी श्री.सागर शंकर शिरसाट (दोडामार्ग), संघटनेच्या सल्लागार पदी श्री.प्रशांत वसंत नाईक (दोडामार्ग) श्री.नंदकिशोर पांडुरंग टोपले (भेडशी), श्री वासुदेव विष्णू नाईक (पिकुळे), श्री लक्ष्मण कुसो आयनोडकर (आयनोडे), श्री विजय लाडू जाधव (कुडासे), श्री.रामचंद्र पांडुरंग भिसे (भेडशी) सदस्यपदी शिवदास वसंत मणेरकर, पांडुरंग मोरजकर, लक्ष्मण शेर्लेकर, श्यामसुंदर चांदेलकर, सुनील म्हावळणकर, ज्ञानेश उर्फ बंटी मोरजकर, सखाराम सडेकर, अंकुश गवस, कृष्णा धाऊसकर, राधाकृष्ण म्हापसेकर, राहुल गौंडळकर, सिद्धेश केसरकर, प्रणय मोरजकर, विष्णू मुंज, सुभाष कासार अशी जम्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली.यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी सदस्य पदी निवड करण्याचेही ठरविण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वीज वितरण सेवेत दिरंगाई होत असून गेल्या ५०/६० वर्षांपूर्वी उभारलेले वीज खांब सडलेले आहेत आणि त्यावर प्रवाहित असलेल्या जुनाट वीज वाहिन्या व जुने ट्रान्सफॉर्मर यामुळे वीज वितरणामध्ये नेहमीच खंड पडत असून अनेक वेळा जीवितहानी होण्याचे देखील प्रकार झालेले आहेत. सर्वप्रकारच्या सुविधा असताना देखील ग्राहक हितासाठी कित्येक गावांमध्ये महावितरणकडून वर्षानुवर्षे वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडी तोडल्या जात नाहीत, खांबांवर वाढणाऱ्या वेल सदृश्य रोपांची कटाई केली जात नसल्याने वीज गळतीचे प्रमाण कितीतरी पटीने वाढले आहे. परंतु महावितरण स्वतःच्या नाकर्तेपणामुळे होत असलेल्या वीज गळतीचा अधिभार ग्राहकांच्या माथी मारून अक्षरशः ग्राहकांच्या खिशातील पैशांची लूट करत असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे मत झाले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे महावितरणच्या सेवेत सुधारणा होण्यासाठी, मागणी करूनही कर्मचारी भरती , अधिकारी नियुक्ती आदी होत नसल्याने जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्यांना, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून तालुका कार्यकारणी स्थापन केल्या जात आहेत व वीज ग्राहक संघटनेच्या वतीने ग्राहकांमध्ये जनजागृती करून महावितरणकडून चांगली सुविधा मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटना कार्यकारिणी जाहीर झालेली असून लवकरच नवीन अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणीची बैठक आयोजित करून २६ जानेवारी रोजी महावितरणचे जिल्ह्यातील मुख्य कार्यालय असलेल्या कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देऊन सहभागी होण्यासाठीची रणनीती आखली जाणार असल्याचे तालुका कार्यकारिणीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

या बैठकीचे सूत्रसंचालन सचिव श्री.दशरथ मोरजकर यांनी व प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष श्री.दीपक पटेकर यांनी केलं. वीज ग्राहक संघटनेची सविस्तर माहिती, ग्राहकांचे हक्क याबाबत मार्गदर्शन जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आणि आभार श्री.वासुदेव नाईक यांनी मानले. यावेळी रूपेश मयेकर, पांडुरंग बोर्डेकर, श्रवणकुमार राजपुरोहित यांच्यासह अनेक वीजग्राहक, पत्रकार उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा