केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या २१ जानेवारी रोजीच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल
कणकवली :
२१ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रमात केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हे सहभागी होणार आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून सकाळच्या सत्रात वेंगुर्ला, दुपारी कुडाळ वालावल,त्यानंतर कुणकेश्वर देवगड येथे मंदिरामध्ये उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११.०० वा. सातेरी मंदिर वेंगुर्ला,दुपारी १२.०० वा. लक्ष्मी नारायण मंदिर, वालावल तर सायं ०३.०० वा. कुणकेश्वर मंदिर, देवगड येथे मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तर दि. २२ जानेवारी कुडाळ – वेताळबांबार्डे येथील राम मंदिराच्या पुजेस सकाळी ११.०० वा. उपस्थिती राहणार आहे. भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.