You are currently viewing “कर्तृत्वाची उंच भरारी”….

“कर्तृत्वाची उंच भरारी”….

आज अतिशय आनंदादायी आणि मनाला समाधान देणारी चांगली बातमी ऐकायला मिळाली. स्पर्धेच्या युगात ज्ञानाच्या कक्षा एवढ्या विस्तारलेल्या आहेत की विविध क्षेत्रात त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पहायला मिळतात.
कोरोना नंतरचे जग कसे असेल? याबाबतची चर्चा सर्व स्तरावर सुरु आहे.शिक्षण ही आता मुलभुत गरज आहे आणि म्हणूनच भविष्यातील अनेक आव्हाने पेलण्यासाठी आपण समर्थपणे सामोरे गेल पाहिजे आणि त्यासाठी रचनात्मक समाजबांधणीसाठी समाजातील ज्ञानी आणि अभ्यासू लोकांना योग्य संधी देण्याची गरज आहे.
आजची स्थिती पहाता सायन्स आणि तंत्रज्ञान याचा योग्य समन्वय साधून शिक्षणक्षेत्रातही काही आवश्यक बदल गरजेचे आहेत हे विचारात घेऊन या क्षेत्रातील अभ्यासू आणि तज्ञ डाँ संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असताना शाश्वत,सम्रुध्द आणि विकासाभिमुख शिक्षण व्यवस्थेचा आग्रह धरुन काम केलेल होत..आणि आजही करत आहेत.त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन त्यांना मेघालय सरकारच्या वतीने मेघालयचे मा.राज्यपाल सत्यपाल मलिकसाहेब यांच्या हस्ते मेघालय विद्यापीठाची Honorary Degree of Doctor of Science ने गौरविण्यात आले.
डॉ. संजयजी देशमुख आपले मनःपूर्वक अभिनंदन! We proud of you ..

…अँड नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा