*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहाची टपरी! तू व मी*
तू सोडून गेल्यापासून
टपरी वरचा चहा बेचव लागतो
तुझ्याशी कधीच बोललो नाही
दुरूनच तुझ्याकडे बघत होतो ..
उराशी प्रेम ह्दयाशी जपलं
टपरीतून तुला निरखत राहिलो
टपरी तू व मी…माझी दुनिया
चहात बुडवून आशिकीत डुबलो..
प्रेमांत तुझ्या बुडून गेलो
तू दिसली नाहीस की
एखादी कपबशी फुटायची
खिश्याला चाट बसली जरी
माझी दुनिया तिथेच थांबायची ..!
दिवसभर हुरहूर लागून राहायची
तुझ्या दर्शना करता तास न तास
मी चहा ढोसत राहायचो
टपरी! तू व मी…जगणं
माझं जग चहांत बुडवायचो ..!
दिवस उजाडला
मी उद्ध्वस्त झालो
त्या दिवशी,फुलांनी सजवलेल्या
गाडीतून वाजत-गाजत
तुझी वरात निघाली ..!
सार कांही संपल!अंत माझा झाला
टपरीच्या माझ्या जगण्याचा झाला
दिवसभर चहात बुडवून घेतलं.!
टपरीची उधारी चुकवली
टपरी सोडली ती कायमची
कहाणी संपली एकतर्फी प्रेमाची
सध्या मी दुसरी टपरी शोधली ..!
अजूनही शोधतो आहे तुझ्यासारखीच
अव्यक्त प्रेम व्यक्त करण्यासाठीच
पण तू गेल्यापासून
जगण्यांत बराच फरक पडला
जिंदगीचा स्पेशल चहा हल्ली
साधा कटींग चहा झाला ..!!
बाबा ठाकूर धन्यवाद
*संवाद मिडिया*
*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*
*ADVT LINK👇*
————————————————
🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*
👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*
👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*
👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*
👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*
👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*
👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*
👉 आजच खरेदी करा…📝
🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*
📱9289922336, 7666212339
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

