You are currently viewing प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली

प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली

*प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली*

*आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने राममंदिरात महाआरती*

*शहरात काढण्यात आली भव्य मिरवणूक व मोटारसायकल रॅली*

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने उत्सव साजरा केला जात असून आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरात प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी श्री राम नामाचा जयघोष करण्यात आला. मामा वरेरकर नाट्यगृह येथून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. तेथून बाजारपेठ मार्गे पिंपळपार वरून बस स्टॅन्ड नजीकच्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली. प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमून गेली होती.
याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी,महेश जावकर, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, पराग नार्वेकर, गणेश कुडाळकर,महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे,पूनम चव्हाण,कुडाळ विधानसभा युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत,आकांशा शिरपुटे, शहर प्रमुख रश्मी परुळेकर,निनाक्षी शिंदे, सन्मेष परब,अमित भोगले,दीपक देसाई,बंडू चव्हाण,समीर लब्दे,राजेश गावकर,विजय पालव,भगवान लुडबे,पूजा तोंडवळकर,प्रसाद आडवणकर,तपस्वी मयेकर,श्री. मोंडकर,प्रवीण लुडबे,अक्षय रेवंडकर,उमेश मांजरेकर, बंड्या सरमळकर,सिद्धेश मांजरेकर,राहुल परब आदींसह मालवण तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − five =