You are currently viewing स्मृति भाग ३३

स्मृति भाग ३३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३३*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण स्मृतिशास्त्रातील काही वेचक वेधक श्लोक पहात आहोत . काव्य शास्त्र आणि विनोद यात विद्वानांचा वेळ जातो , असं म्हणतात !! थोडं शास्त्र बाजूस ठेवून एक विनोद आठवला , तो सांगतो .

हायस्कूलमधे होतो . त्यावेळेस वडिलांनी उत्तर देण्याच्या आदर्श उदाहरणावरुन हा विनोद सांगितलेला जसा आठवतो तसा . विनोबाजी भावे . एक उत्तुंग व्यक्तिमत्व . कर्मयोगाचं एक वेगळं शिखरच !! बरेच जण त्यांना भेटायला जायचे . एकदा एक उमेदवार खासदारकीची निवडणूक निवडून आले . विनोबाजींना भेटण्याची हौस निर्माण झाली !! काही नाटकी राजकारण्यांना चांगल्या लोकांच्या सान्निध्याचा फायदा उठवण्याची तशी हौस असतेच !! तसे हे ही गेले भेटायला . सोबत स्तुतिपाठकांची फौज होतीच . बसले विनोबाजींचे समोर . पुढारी महाशयांना प्रश्न विचाण्याची हौस . त्यांनी विनोबाजींना एक प्रश्न विचारला . ” या जगात जीवन जगत असतांना सगळ्यात मोठं सुखं कोणतं ? ” प्रश्न विचारून झाल्यावर सर्वांकडे नजर वळवून पाहिले , ” मी कसा प्रश्न विचारला उत्तम ? असा कोणी विचारु शकेल ? ” या आविर्भावात !!!! पण कर्मयोगी कमी आणि मोजकंच बोलतात , हे थोडी माहित आरक्षण वा पैशाचे जिवावर निवडणूक लढणार्‍यांना !!! विनोबाजींनी उत्तर दिले . ते उत्तर ऐकून सगळ्यांचे चेहर्‍यावर हास्य व विचारणाराचे हिरमुसलेपण सहज दिसत होते . उत्तर होते , ” सकाळी सकाळी शौचास साफ होणे हे जगात असतांनाचं सगळ्यात मोठं सुख आहे !! ” आपणही हसलात ना ! हे विनोबाजींचे उदाहरण जर खूप काही शिकवत असेल तर …………… ऋषि वाईट असतील ? सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा .🙏🙏

विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? उद्या काही श्लोक पाहू .🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————

जग झपाट्याने बदलत चाललंय…🌐

टेक्नॉलॉजीमध्ये पण निरंतर प्रगती होत आहे..🤗

 

*काळाप्रमाणे आपणही बदलणार की नाही ?*🤔

 

*बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायाला अधिक सक्षम करा.*😇

 

👉 *खाद्य पदार्थ क्षेत्र* म्हणजे *फूड इंडस्ट्री* मध्ये डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

 

👉डिहायड्रेशन पद्धतीचा अवलंब करुन आपण *रेडी टू कूक, रेडी टू इट तसेच पावडर, फ्लेक्स* या प्रकारात शेकडो प्रॉडक्ट्स बनवू शकतो.

 

👉 फळं, भाज्या, हंगामी पिके, मासे इत्यादी वस्तू अनेक कारणांमुळे बऱ्याच अंशी खराब होतात, वाया जातात, त्याचा पूर्ण वापर होत नाही.

 

👉 *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी* वापरुन या सर्व वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, वर्षभर त्याचा लाभ घेता येईल.

 

👉 सध्या सर्वत्र डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे आणि या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्सची रेंज, आवाका पण खूप मोठा आहे.

 

👉 *सखोल प्रशिक्षण, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे डिहायड्रेशन व्यवसायात चांगली कामगिरी करु शकतो, भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.*

 

👉 *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने 19-20-21 जानेवारी रोजी *कुडाळ* येथे 3 दिवसीय *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.

 

👉 हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित असून व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

 

👉 हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया *DHY* असा व्हॉट्स ॲप मेसेज *8767473919* या क्रमांकावर पाठवावा.

 

👉 हा मेसेज आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करा, सहकार्य करा.

 

🛑 *टीम अभिनव*

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा