You are currently viewing रेडी येथे “दीपोत्सव” व ” एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी” पुष्प अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न.

रेडी येथे “दीपोत्सव” व ” एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी” पुष्प अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे आयोजन.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दिपोत्सव व एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी प्रज्वलित करून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील श्री सपतेश्वर स्वयंभू महादेव मंदिरात दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी श्री देवी माऊली जत्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात झाला.
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा सीए श्री साईप्रसाद कल्याणकर यांनी सपत्नीक व स्थानिक सर्व महिलांनी एकत्र येऊन प्रथम श्री महादेवाची विधिवत पूजन केले. त्यानंतर भारतीय सीमेवर लढतांना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानांना भारतीय आर्मी च्या निवृत्त जवानांच्या हस्ते पुष्प अर्पण करून, दोन मिनिटे स्तब्ध राहून वीर जवानांना उपस्थित असलेल्या सर्व महिलां समवेत आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी स्थानिक महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमास निवृत्त ब्रिगेडीअर तथा माजी खासदार श्री सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे सचिव श्री चंद्रशेखर जोशी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील श्री संतोष चेंदवणकर, निवृत्त नायब सुभेदार, आर्मड रेजिमेंट, श्री. विनायक बागायतकर, नायब सुभेदार, सिग्नल रेजिमेंट व श्री. दीपक आरोसकर, लान्स नायक, मराठा रेजिमेंट यांचा संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साईप्रसाद कल्याणकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे ५८ महा. बटालियन, सिंधुदुर्ग चे अधिकारी वकील श्री. विवेक राणे, वेंगुर्ल्याचे श्री. लवू विठ्ठल तेरसे, सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. आशिष सुभेदार तसेच संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीम. रीमा मेस्त्री व इतर महिला पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिलांनी मंदिरात व मंदिर परिसरात १२५१ दीप प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा केला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष साईप्रसाद कल्याणकर यांनी आपण भारत देशाचे नागरिक आपल्यासाठी आपले जवान देशाच्या सीमेवर आपल्या डोळ्यात तेल घालून आपणास त्रास सहन करून आमचे संरक्षणाची आपण जबाबदारी घेतात, आपण त्यामुळे सुखाची निद्रा निश्चिन्त राहून घेतो अशा परिस्थितीत आपल्या देशात कायदा व सुव्यवस्था आपण बिघडवू नये हे आपले कर्तव्य आहे कायद्याचे मनोभावे पालन करावे असे मत व्यक्त केले.
देशाच्या सीमेचे रक्षण करणारा जवान हा जसा महत्वाचा आहे तसा शेतकरी देखील महत्वाचा आहे, त्याचा सन्मान हा व्हायलाच हवा असे मत अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नविनचंद्र बांधीवडेकर यांनी व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहून निवृत्त जवानांच्या कार्याचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे . संस्थेने केलेला कार्यक्रम हा देश भक्तीचा व हिताचा असल्याचे मत सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाचे मुख्य संपादक श्री. शमशूद्दीन शेख यांनी व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
भारतीय जवानांचा देशाच्या प्रती बजावलेल्या प्रामाणिक कर्तव्याचा आदर करणे व वीरगती प्राप्त झालेल्या जवानांची आठवण म्हणून त्यांना आदरांजली वाहणे असे कार्यक्रम सर्व ठिकाणी राबविले जावेत असे मत भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री. आशुतोष त्रिपाठी यांनी व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
दिपोत्सव साजरा करण्याचे हे चौथे वर्ष असून या माध्यमातून गावचे हित व समाजात सामाजिक ऐक्य, बंधुता व बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने कार्यक्रम साजरा केला जातो असे संस्थेचे सीईओ राजन रेडकर यांनी सांगितले. तसेच सादर कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता संस्थेचे जिल्हाध्यक्ष दाजी नाईक, जगन्नाथ राणे, रविंद्र राणे, सौरभ नागोळकर, आबा चिपकर, पृथ्वीराज राणे, राजेश सातोसकर, ताता नाईक, मुरलीधर राऊळ, दयानंद कृष्णाजी, चंद्रकांत नागोळकर, महादेव मराठे, सिद्धेश शेलटे व इतर तसेच संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल राजन रेडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा